ःकॅनिंगला 55 रुपये दर असून बागायतदारांची पाठ

ःकॅनिंगला 55 रुपये दर असून बागायतदारांची पाठ

३१ (पान ५ साठी)


-rat११p४१.jpg ः
२३M०२१७४
राजापूर ः भरलेली आंब्याची पेटी.
-rat११p४२.jpg ः
२३M०२१७५
पेट्या भरण्यासाठी काढलेले आंबे.
---------------

आंबा बागायतदारांची निंगकडे पाठ

उत्पादनातील घटीमुळे दर टिकून ; यावर्षी अजूनही साडेतीन हजारावर पेटी

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ ः हापूस आंब्याच्या मे महिन्याच्या अंतिम हंगामामध्ये घसरणाऱ्या आंब्याच्या दरामुळे आंबा बागायतदार वा व्यापाऱ्‍यांकडून दरवर्षी कॅनिंगला विशेष महत्व दिले जाते. मात्र, यावर्षी दरवर्षीच्या तुलनेमध्ये मे महिन्यातील अंतिम हंगामामध्ये पेटीला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांनी कॅनिंगकडे पाठ फिरवली आहे. प्रतिकिलो २० ते २५ रु. कॅनिंगचा असणारा दर यावर्षी ४०-५५ रु. आहे. कॅनिंगचा दर समाधानकारक असला तरी यावर्षी कॅनिंगसाठी आंबा कुठेय? अशी म्हणण्याची वेळ कॅनिंग खरेदी व्यावसायिकांवर आली आहे.
यावर्षी हापूसचे उत्पन्न घटले आहे. त्यामध्ये सातत्याने पडणाऱ्‍या पावसामध्ये होणाऱ्‍या नुकसानीची भर पडली आहे.

हापूस आंब्याच्या हंगामाच्या सुरवातीपासून चांगलाच दर मिळू लागला आहे. हा दर मे महिन्यातील हंगामाच्या अंतिम टप्प्यातही कायम राहिलेला आहे. सद्यःस्थितीमध्ये पेटीला सरासरी ४ हजार रु. दर मिळत असल्याचे काही बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अंतिम टप्प्यामध्ये पेटीला सरासरी ८०० ते ९०० रु. भाव मिळतो. यावर्षी उत्पन्न कमी असल्याने अजूनही दर साडेतीन ते चार हजार रुपये पेटी असा असल्याने व्यापारी आणि बागायतदारांकडून बाजारपेठेमध्ये पेट्या पाठवण्यावरह भर दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे मे महिन्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असलेल्या कॅनिंग व्यवसायावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com