संक्षिप्त

संक्षिप्त

पान ५ साठी, संक्षिप्त)

भास्कराचार्य उपक्रमात दापोली तालुक्याचे सुयश
दाभोळ : दापोली पंचायत समिती दापोली व्हिजन उपक्रमामुळे मागील पाच वर्षांत दापोलीच्या गुणवत्तेमध्ये वाढ होत असतानाच जि. प. रत्नागिरीनेही मुलांच्या बुद्धिमतेचा कस लावत विविध उपक्रम राबवले. यामध्ये ३ री ते ७ वी मधील मुलांसाठी आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य आणि ४ थी व ७ वीसाठी प्रज्ञाशोध या परीक्षा घेतल्या होत्या. या परीक्षेत दापोली तालुक्यातून तिसरीमध्ये अनुक्रमे क्रमांक ऋग्वेद गुरव, ओम मुंडे, आदिती घाणेकर, चौथीमध्ये अनुक्रमे गार्गी दांडेकर, वेद आग्रे, आयुष भुवड, पाचवीमध्ये अनुक्रमे क्रमांक सोहम सावंत, तनया शिगवण, सोनाक्षी गायकर, सहावीमध्ये अनुक्रमे क्रमांक वृषभ बनगुले, विनायक माने, शुभम जोशी, सातवीमध्ये अनुक्रमे अनिष्का शिगवण, तनीष चव्हाण, श्रवण चिंचविलकर. रत्नागिरी टॅलेंट सर्च परीक्षेत चौथीमध्ये वेद आग्रे प्रथम, आरुषी आंबेकर द्वितीय, सार्थक फडके तृतीय. सातवीमध्ये अनुक्रमे सुयश गोसावी, प्रेम तांबे, मानस घुबडे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आमदार योगेश कदम, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे आणि गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांच्या हस्ते मेडल आणि प्रशस्‍तिपत्र देऊन गौरवण्यात आले.

दापोलीत ५० थकीत करदात्यांना नोटिसा
दाभोळ ः दापोली नगरपंचायतीने मार्चअखेरपर्यंत थकीत कर, पाणीपट्टी, वीजबिल तसेच इतर संस्था वसुलीकरिता मार्च महिन्यात वसुलीला जोर लावला होता; मात्र थकीत राहिलेल्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यातील ५० टक्के थकीत कर ग्राहकांनी महावितरण व दापोली नगरपंचायतीकडे भरणा केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दापोली नगरपंचायतीने थकीत कर वसुलीसाठी १५० जणांना नोटीस बजावल्या होत्या. महावितरणने वीजबिलाचा भरणा न केलेल्या १८५ जणांचा वीजपुरवठा खंडित केला होता. यातील ५० टक्के ग्राहकांनी वीजबिल भरणा करून वीजपुरवठा सुरळीत करून घेतला आहे. नगरपंचायतीने ५० नागरिकांना थकीत करापोटी पुन्हा अंतिम नोटीस देऊन कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

मराठी स्वाक्षरी स्पर्धेत घाग प्रथम
दाभोळ ः शिवसेना, युवासेना ठाकरे गटाच्या वतीने दापोलीत मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी या मराठी स्वाक्षरी स्पर्धेत प्रतीक्षा घाग यांनी प्रथम, संजीवकुमार शिंदे द्वितीय, जितेंद्र गावडे तृतीय तर नागेश देवळेकर यांनी उत्तेजनार्थचे परितोषिक पटकावले आहे. या स्पर्धेचे परीक्षण विद्याधर ताम्हणकर व दर्शना राऊत यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभाला माजी आमदार सूर्यकांत दळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख रूपेश बेलेासे, नगराध्यक्षा ममता मोरे, शहरप्रमुख संदीप चव्हाण, उपशहरप्रमुख विक्रांत गवळी, शिवसेना युवती शहरप्रमुख सायली गावडे आदी उपस्थित होते.

कुडावळेत विकासकामांचे भूमिपूजन
दाभोळ : माझे कुटुंब राजकारणावर अवलंबून नाही. मी समाजकारण करण्यासाठी राजकारणात आलो असून, त्यातूनच कुडावळे गावासाठी मी कोट्यवधीचा निधी आणू शकलो आणि त्यामुळे गावाचा विकास करण्याची संधी मला मिळाली, असे प्रतिपादन आमदार योगेश कदम यांनी कुडावळे देवखोलवाडी येथे झालेल्या सभेत बोलत होते. कुडावळे भोईदवाडी येथे सभामंडप बांधणे कामासाठी १५ लाख, कुडावळे वळजाईवाडी रस्ता डांबरीकरण करणे ७ लाख, कुडावळे कदमवाडी येथे स्मशानशेड बांधणे ४ लाख, देवखोलवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ७० लाख आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेकरिता २ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर झाल्यावर या कामांचे भूमिपूजन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

सोहनी विद्यामंदिरचे सुयश
दाभोळ : २०२३ या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित आदरणीय गोपाळ कृष्ण सोहनी प्राथमिक विद्यामंदिरच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या परीक्षेमध्ये पहिलीमधील स्वयम पवळ्याने सुवर्णपदक पटकावले. दुसरीमधील आदिनाथ शिगवण व आराध्य पास्ते यांना रौप्यपदक मिळाले. मयुरी बर्वे, अंजली फुलारे, धुरवी इस्वलकर, भार्गवी डोंगरे, सार्थकी दाभोळे, वेदिका चौगले यांना कास्यपदक, तिसरीमधील सन्मित राणेने सुवर्णपदक, तन्मया डोंगरे, अन्वेषा बिरादार, शर्विल होगले, स्वरा होगले, सिया कुलकर्णी यांनी कास्यपदक मिळवले. चौथीमधील प्रणव देवघरकर या विद्यार्थ्याने रौप्यपदक मिळवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com