
रत्नागिरी ः क्राईम पट्टा
वाटद-खंडाळा येथे घरफोडी
रत्नागिरी, ता. ११ः तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे घराच्या पुढील दरवाज्याचे कडी कोयंडा कोणत्यातरी धारदार हत्याराने उचकटून चोरट्याने घरातील ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. जयगड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ ते १० मे या कालावधीत घडली. बुधवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास वाटद खंडाळा येथे निदर्शनास आली. फिर्यादी यांचे दीर विनोद पंढरीनाथ गडदे यांच्या घरात झोपण्यासाठी गेलेले असताना चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचा पुढील दरवाजाची कडी कोयंडा कुलपासह कोणत्यातरी हत्याराने तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. बेडरुमधील लोखंडी कपाटाचा दरवाजा व लॉकर कोणत्यातरी हत्याराने उचकटून कपाटातील लॉकरमध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व २ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम असा ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात फिर्यादींनी तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दारू बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई
रत्नागिरी ः शहरातील मिरकरवाडा व खालची आळी येथे विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री व दारू जवळ बाळगल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार किरण वाघेला (वय ३०, रा. आंबेडकरवाडी, रत्नागिरी) व सफवान इम्तियाज सोलकर (वय ३३, रा. झोपडपट्टी मुरुगवाडा, रत्नागिरी) अशी संशयितांची नाव आहे. या घटना बुधवारी (ता. १०) सात ते साडेआठच्या सुमारास मिरकवाडा व खालची आळी येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिरकरवाडा येथे संशयित वाघेला यांच्याकडे विनापरवाना २५० रुपयांची पाच लिटर दारु पोलिसांनी सापडली. तर संशयित सोलकर यांच्याकडे खालची आळी येथील गडग्याच्या आडोशाला २२० रुपयांची सीलबंद इंग्लीश दारुची बाटली स्वतःकडे बाळगल्यास्थितीत सापडले. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.