दाभोळ ः ठाकरे सेनेतील आमदार, नगरसेवक शिवसेनेकडे येतील

दाभोळ ः ठाकरे सेनेतील आमदार, नगरसेवक शिवसेनेकडे येतील

-rat११p४३.jpg ःM०२१८२ दापोली ः आमदार योगेश कदम यांची शिवसनेचे प्रवक्ते म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना सुधीर कालेकर, प्रदीप सुर्वे.
----------------

ठाकरे सेनेतील आमदार शिवसेनेकडे येतील

आमदार योगेश कदम ; दापोलीत फटाक्यांची आतषबाजी

दाभोळ, ता. ११ ः सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे संभ्रमावस्थेत असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक हे शिवसेना पक्षाकडे येतील. त्यांच्याशी बोलणी सुरू असल्याची माहिती दापोली विधानसभा मतदार संघातील आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना खुर्ची व राष्ट्रवादी सोडवत नव्हती. त्यांनी खुर्चीच्या हट्टापायी आपला पक्ष संपवला; मात्र आता आमचा पक्ष हाच शिवसेना पक्ष असल्याचे व आम्ही शिवसेनेचे असल्याचे न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे आता संभ्रमावस्थेत असणारे अनेकजण आपल्याकडे येतील, असा दावा त्यांनी या वेळी केला. आजच्या निकालामुळे आम्ही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार यात शंका नाही. या उरलेल्या काळात विकासकामांवर भर देणार असल्याचे देखील व विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा वेळ आपल्याकडे नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आपले सरकार घटनाबाह्य असल्याच्या टीकेला देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पूर्णविराम मिळालेला आहे. आपले सरकार हे घटनेनुसार व संविधानानुसार असल्याचे कोर्टाच्या निकालाने सिद्ध झाले आहे असे ते म्हणाले. निकालानंतर शिवसेनेच्या तालुका कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली व पेढे वाटण्यात आले. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, तालुका संघटक प्रदीप सुर्वे, ममता शिंदे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com