26 ला ऑनलाईन रोजगार मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

26 ला ऑनलाईन रोजगार मेळावा
26 ला ऑनलाईन रोजगार मेळावा

26 ला ऑनलाईन रोजगार मेळावा

sakal_logo
By

३३ (पान ३ साठी)

२६ ला ऑनलाईन रोजगार मेळावा

रत्नागिरी, ता. ११ ः रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन येत्या २६ मे रोजी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदे भरण्याबाबत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या विभागाचे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर रिक्ते पदे नोंदवावी. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी त्यांच्याकडील यूजर आयडी व पासवर्डचा वापर करून लॉगइन करून त्यांच्याकडील रिक्त पदे नोंदवावी तसेच नोंदणी नसल्यास नवीन नोंदणीकरिता व अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी यांनी केले आहे.