
दिवसांनंतर पशुराम घाटातील वाहतुक नियमित
२९ ( पान १ साठी)
- RATCHL११४.JPG ः
२३M०२१७६
चिपळूण ः परशुराम घाटातून नियमित सुरू झालेली वाहतूक.
------------
पशुराम घाटातील वाहतूक नियमित
वाढीव मुदतीची मागणी फेटाळली ; ३ दिवसांनंतर काँक्रिटीकरण सुरू
चिपळूण, ता. ११ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गेल्या १६ दिवसांपासून बंद असलेला पशुराम घाट वाहतुकीसाठी आजपासून नियमितपणे २४ तास सुरू झाला आहे. यामुळे महामार्गावरील अवजड वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला. परशुराम घाटात संरक्षक भिंतीच्या बाजूने काँक्रिटीकरणासाठी मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. ३ दिवसांनंतर येथे काँक्रिटीकरण सुरू केले जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी घाटात काँक्रिटीकरणाचा एकेरी मार्ग सुरू करण्यावर ठेकेदार कंपनीकडून भर देण्यात आला आहे.
परशुराम घाटात अत्यंत अवघड व धोकादायक असलेल्या ठिकाणी डोंगरकटाईचे काम मार्गी लागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २६ एप्रिल ते १० मे दरम्यान घाटातील वाहतूक दुपारी १२ ते सायं. ५ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. ही मुदत संपल्यानंतर ११ मे पासून घाटातील वाहतूक २४ तास नियमितपणे सुरू केली आहे. ठेकेदार कंपनीकडून उर्वरित कामासाठी वाढीव मुदतीची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती; मात्र त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली नाही. दरम्यान, घाटातील वाहतूक सुरू ठेवूनच चौपदरीकरणाची कामे केली जात आहेत. घाटात खेड हद्दीत सुमारे ४०० ते ४५० मीटरचे काँक्रिटीकरणाचे काम बाकी आहे. घाटातील वाहतूक सुरू ठेवून पावसाळ्यापूर्वी दोन्ही मार्ग काँक्रिटीकरण करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग तसेच ठेकेदार कंपनीकडून ठेवण्यात आले आहे.