बांदा परिसराला अवकाळीने झोडपले

बांदा परिसराला अवकाळीने झोडपले

swt1118.jpg
02209
मडुराः परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. (छायाचित्रः नीलेश मोरजकर)

बांदा परिसराला
वाऱ्यासह पाऊस
बांदा, ता. ११ः शहर व परिसराला आज सकाळी मेघगर्जनेसह पावसाने झोडपून काढले. सकाळी तब्बल दोन तास पाऊस सुरू होता. पावसाने काजूसह नगदी पिकांचे नुकसान झाले. शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता.
आज पहाटे सहा वाजता विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तब्बल दोन तास झालेल्या पावसाने शहर व परिसराला झोडपून काढले. पावसाने काजू बागायतदारांसह उन्हाळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याचा फटका मिरची, चवळी पिकांना बसला. पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com