विशिता खून प्रकरणी मोबाईल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशिता खून प्रकरणी मोबाईल जप्त
विशिता खून प्रकरणी मोबाईल जप्त

विशिता खून प्रकरणी मोबाईल जप्त

sakal_logo
By

swt1119.jpg
02221
दोडामार्गः झाडीत लपून ठेवलेल्या वस्तूंचा शोध घेताना पोलिस.

swt1120.jpg
02222
दोडामार्गः तिलारीच्या पुच्छ कालव्यात दोरी फेकलेली जागा दाखविताना. (छायाचित्रेः संदेश देसाई)

विशिता खून प्रकरणी मोबाईल जप्त
तपासाला वेगः मृतदेह ओढण्यासाठी वापरलेली दोरीही सापडली
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ११ः पत्नीचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह नदीत टाकल्यानंतर मृतदेह ओढण्यासाठी वापलेली दोरी तो फेकलेल्या ठिकाणाहून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तिलारी पुच्छ कालव्यात फेकून दिली; मात्र तिचा मोबाईल मृतदेहापासून काही अंतरावर झाडीत लपविला होता. विशिता नाईक खूनप्रकरणी ताब्यात घेतलेल्या पती व त्याचा साथीदार यांच्याकडून ही माहिती घेऊन व त्यातील एकाला घटनास्थळी नेऊन दोरी व मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. अजून काही पुरावे हाती लागतात काय? या दिशेने दोडामार्ग पोलिसांचा तपास चालू आहे.
घोटगेवाडी-भटवाडी येथे कॉजवेच्या खाली चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची ओळख येथील पोलिसांनी अवघ्या काही तासातच लावली होती. याप्रकरणी काही तासातच येथील पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. गोवा म्हापसा येथून जेरबंद केलेले विनोद मनोहर नाईक व ऋतुराज श्रावण इंगवले या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मृत महिलेचा पती विनोद नाईक याने ऋतुराज इंगवले या साथीदाराच्या साहाय्याने आपल्याच पत्नीचा काटा काढल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले आहे. या प्रकरणी अधिक तपासाअंती पत्नीला मारण्यासाठी वापरलेले पुरावे लपून ठेवल्याचेही पती विनोद नाईक याने सांगितले. त्यानुसार खुनातील विनोदाचा साथीदार ऋतुराज इंगवले याला पोलिसांनी घटनास्थळी नेले. मृतदेह फेकलेल्या ठिकाणी काही अंतरावर झाडीत लपून ठेवलेला महिलेचा मोबाईल त्याने दाखविला. तेथून पोलिसांनी तो मोबाईल ताब्यात घेतला. मृतदेह ओढण्यासाठी त्यांनी दोरीचा वापर केला होता. ती दोरी मृतदेह फेकलेल्या ठिकाणावरून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असेलल्या तिलारीच्या पुच्छ कालव्यात नेऊन फेकली होती. त्या ठिकणी जाऊन ती जागा ऋतुराज इंगवले यांच्याकडून पोलिसांनी दाखवून घेतली. ज्या ओढणीने खून केला होता ती मृतदेह ओढण्यासाठी अपुरी पडत होती. म्हणून या दोघांनीही त्या ओढणीला दोरी बांधून मृतदेह ओढत नेला होता. जप्त केलेल्या दोरीला ओढणीचे तुकडेही लागलेले आहेत. या प्रकरणी अजून काही पुरावे हाती लागतील काय? या दिशेने तपास चालू असल्याचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले. दोन्हीं पुरावे पोलिसांनी दोन पंचांच्या समक्ष जप्त केले आहेत. यावेळी घनस्थळवरून पुरावे गोळा करण्यासाठी ऋतुराज इंगवले याला घेऊन पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलिस रामचंद्र मळगावकर, वसंत देसाई, सामजिक कार्यकर्ते मायकल लोबो गेले होते. 
--------------------
चौकट
पूर्वनियोजित कट?
विशिता यांचा खून रागाच्या भरात केल्याचा अंदाज व्यक्त होत असला तरी काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. पत्नीला जेवणाच्या बहाण्याने पती विनोद नाईक व त्याचा साथीदार ऋतुराज इंगवले या दोघांनी जरी दोडामार्ग येथे आणले असले तरी तिचा कायमचा काटा काढायचा हा त्यांचा आधीच कट होता का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ते दोघेही तयारीनिशी दोरी घेऊन आले होते. गोव्यात चांगली हॉटेल्स असतानाही जेवणासाठी त्यांनी दोडामार्ग निवडले. फक्त जेवणासाठीच आले असते तर येथील बाजारपेठेत जेवून ते माघारी जाऊ शकले असते. परंतु दोडामार्ग बाजार पेठेपासून तिलारीच्या दिशेला पंधरा किलोमीटर अंतरावर निर्जनस्थळी तिला घेऊन गेले. आणि, त्यांनी हे कृत्य केल्याने हा पुर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त होत आहे.