तिलारी घाटात टेम्पोला अपघात

तिलारी घाटात टेम्पोला अपघात

swt1121.jpg
02227
दोडामार्गः तिलारी घाटात चारचाकीची वाहतूक करणारा पलटी झालेला टेम्पो. (छायाचित्र- संदेश देसाई)

तिलारी घाटात टेम्पोला अपघात
ताबा सुटल्याने प्रकारः चालक-वाहक बालबाल बचावले
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ११ः तामिळनाडू ते गोवा असा चारचाकी वाहतुक करणाऱ्या आयशर टेम्पोला तिलारी घाटात अपघात झाला. येथील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो संरक्षक कठड्याला धडकला व पलटी झाला. हा अपघात आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडला. टेम्पो पलटी झाला नसता तर थेट दरीत कोसळला असता. केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक व वाहक बचावले.
तिलारी घाटात अनेक अपघात घडत आहेत. झालेल्या अपघातात काहींचे प्राणही गेलेत. त्यामुळे अवजड वाहतुकीसाठी हा घाट धोक्याचा इशारा देत आहे. असाच एक अपघात आज घडला. इतर राज्यातून चारचाकी खरेदी करून ते गोव्यात आणून विकण्याचा गोव्यातील सर्वेश सावर्डेकर यांचा व्यवसाय आहे. त्यांनी तामिळनाडू येथे दोन चारचाकी वाहने खरेदी केल्या होत्या. ती दोन्ही वाहने आज ते गोव्याच्या दिशेने घेऊन येत होते. त्यातील एक मोटार ते स्वतः चालवत होते. दुसरी मोटार चालविण्यास चालक नसल्याने त्यांनी त्याठिकाणी भाड्याच्या आयशर टेम्पो केला. त्या टेम्पोत मोटात कार घालून ते गोव्याच्या दिशेने निघाले होते. स्वतः चालवीत असलेली मोटार पुढे तर भाड्याने घेतलेला आयशर टेम्पो पाठीमागून असा प्रवास ते करीत होते. मात्र, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तिलारी घाटात आले असता अवघड वळणावर आयशर टेम्पो चालकाचा ताबा सुटला व टेम्पो संरक्षक कठड्याला आदळला. कठड्याला धडक बसल्याने टेम्पो जागीच पलटी झाला.

चौकट
जयकर पॉईंट धोकादायक
तिलारी घाट रस्त्यात एक अवघड वळण आहे. त्या जागेला जयकर पॉईंट असे नाव ठेवले आहे. या वळणावर नवख्या वाहन चालकाला अंदाज येत नाही. त्यामुळे या पॉईंटवर वारंवार अपघात घडत आहेत. बांधकाम विभागाने वाहन चालकांना सावध होण्यासाठी काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
--------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com