कुवळे येथील एकाला अटक

कुवळे येथील एकाला अटक

कुवळे येथील एकाला अटक
कणकवली, ता. ११ः देवगड तालुक्यातील कुवळे गावातील एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे. धनादेश न वटल्या प्रकरणी न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांच्यावर ही अटकेची कारवाई केली आहे. उदय सहदेव कदम (वय ४२ ) असे त्यांचे नाव असून त्यांना उद्या (ता. १२) येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संशयित आरोपी उदय कदम यांनी एका प्रकरणांमध्ये दिलेला धनादेश वटला नाही. त्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. या सुनावणीला संशयित आरोपी हजर राहत नव्हते. वारंवार वॉरंट बजावूनही ते गैरहजर राहत असल्याने त्यांना आज अटक वारंट काढण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे एएसआय रामू शेळके, कृष्णा केसरकर, संकेत खाड्ये, राजू जामसंडेकर, प्रमोद काळसेकर यांच्या पथकाने आज सायंकाळी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com