लाच मागणारा वनरक्षक जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाच मागणारा वनरक्षक जाळ्यात
लाच मागणारा वनरक्षक जाळ्यात

लाच मागणारा वनरक्षक जाळ्यात

sakal_logo
By

swt1123.jpg
02231
नारायण शिर्के

लाच मागणारा वनरक्षक जाळ्यात
कणकवलीत कारवाईः कॉल रेकॉर्डवरुन ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ११ः लाकूडतोड आणि वाहतूक पास कामाकरीता पैशाची मागणी केल्याचा फोन ध्वनीमुद्रित करुन जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून कणकवली वन परिक्षेत्र कार्यालयात छापा टाकून वनरक्षकाला ताब्यात घेण्यात आले. नारायण भास्कर शिर्के (वय ५०, रा. कळसुली) असे संशयिताचे नाव आहे. ही कारवाई आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार येथील पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
कणकवली वनक्षेत्रपाल कार्यालयात अलीकडच्या वर्षातील ही दुसरी कारवाई आहे. याबाबत अधिक माहिती अशी कीः येथील वनरक्षक नारायण शिर्के यांनी तक्रारदार यांच्याकडे लाकूडतोड व लाकूड वाहतूक करण्याकरित ४० हजार रुपायांची मागणी केली होती. तडजोडीतून ३५ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. तक्रारदार यांनी याबाबतचे कॉल रेकॉर्ड केले होते व याबाबत ११ एप्रिलला जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला अर्ज दिला होता. त्यानंतर ८ ते १० दिवसांपासून याबाबतची चर्चा सुरु होती. संशयिताला छाप्याबाबतची माहिती समजली होती. त्यामुळे त्यांनी रोकड स्वीकारण्यास टाळाटाळ केली. तक्रारदार यांना बाहेर भेटू असे त्यांनी सांगितले होते. जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (एससीबी) यांनी ठाणे येथील कोकण विभागिय कार्यालयाची पु्र्व परवानगी घेत आज सायंकाळी कणकवली वन परिक्षेत्र कार्यालयात छापा टाकून वनरक्षक शिर्के यांना ताब्यात घेतले व येथील पोलीस ठाण्यात आणले. तेथे लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यत अटकेची कारवाई सुरु होती. जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील, पोलीस निरिक्षक आस्मा मुल्ला, जनार्दन रेवंडकर, निलेश परब, रविकांत पालकर, जितेंद्र पेडणेकर, हवालदार अजित खंडे, प्रथमेश पोतनीस, कांचन प्रभू यांच्या पथकाने ही कारवाई केली.