रत्नागिरी ः क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः क्राईम पट्टा
रत्नागिरी ः क्राईम पट्टा

रत्नागिरी ः क्राईम पट्टा

sakal_logo
By

२१ (पान ३ साठी, क्राईम)

वाटद-खंडाळा येथे घरफोडी

रत्नागिरी, ता. १२ः तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे घराच्या पुढील दरवाज्याचे कडी कोयंडा चोरट्याने धारदार हत्याराने उचकटून चोरट्याने घरातील ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. जयगड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ९ ते १० मे या कालावधीत घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचा पुढील दरवाजाची कडी कोयंडा कुलपासह कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. बेडरुमधील लोखंडी कपाटाचा दरवाजा व लॉकर उचकटून कपाटातील लॉकरमध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व २ हजार ७०० रुपयांची रोकड असा ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात फिर्यादींनी तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
---
दारू करणाऱ्यांवर कारवाई

रत्नागिरी ः शहरातील मिरकरवाडा व खालची आळी येथे विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री व दारू जवळ बाळगल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार वाघेला व सफवान सोलकर अशी संशयितांची नाव आहे. हा प्रकार बुधवारी (ता. १०) सात ते साडेआठच्या सुमारास मिरकवाडा व खालची आळी येथे निदर्शनास आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिरकरवाडा येथे संशयित वाघेला यांच्याकडे विनापरवाना २५० रुपयांची पाच लिटर दारु पोलिसांनी सापडली. तर संशयित सोलकर यांच्याकडे खालची आळी येथील गडग्याच्या आडोशाला २२० रुपयांची सीलबंद इंग्लीश दारुची बाटली स्वतःकडे बाळगल्यास्थितीत सापडले. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.