इंग्रजी चरित्राचे 28 ला प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्रजी चरित्राचे 28 ला प्रकाशन
इंग्रजी चरित्राचे 28 ला प्रकाशन

इंग्रजी चरित्राचे 28 ला प्रकाशन

sakal_logo
By

.२८ (पान ५ साठी)

चरित्रकार धनंजय कीर यांच्या
इंग्रजी चरित्राचे २८ ला प्रकाशन

रत्नागिरी, ता. १२ ः पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या इंग्रजी आणि मराठी भाषांतील चरित्रांचे २८ मे रोजी प्रकाशन होत आहे. राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेले मराठी कीर चरित्र २०११ ला प्रसिद्ध झाले होते. आता त्याची सुधारून वाढवलेली आवृत्ती तयार झाली आहे. मसुरकर यांनीच त्यांचे इंग्रजी चरित्र लिहून पूर्ण केले आहे. हे चरित्र मूळ मराठी चरित्राचे भाषांतर नसून पूर्णतः स्वतंत्रपणे केलेले लेखन आहे.
स्वा. सावरकर यांच्या इंग्रजी चरित्रापासून प्रारंभ करून रत्नागिरी शहराचे सुपुत्र धनंजय कीर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी आणि लोकहितकर्ते बाबासाहेब बोले यांची इंग्रजी व मराठी चरित्रे लिहिली. १९५० ते १९७८ या काळात लिहिल्या गेलेल्या या चरित्रांना आजही मागणी असते आणि बोले चरित्राखेरीज अन्य चरित्रांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. लोकमान्य टिळक चरित्राचे राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलेले भाषांतर २०१४ मध्ये प्रकाशित झाले. भक्कम पुराव्यांवर आधारित माहितीने परिपूर्ण असल्याने धनंजय कीरांनी लिहिलेली चरित्रे इतिहास आणि व्यक्तिचरित्रांच्या संशोधन कार्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि विश्वासार्ह मानली जातात. चरित्रलेखन कसे करावे याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून चरित्र लिहिण्याच्या धनंजय कीर यांच्या पद्धतीने प्रभावित होऊन आपण १९९६ मध्ये त्यांच्या चरित्राचे लेखन करण्याचे ठरवले, असे मसुरकर यांनी सांगितले.