
स्वा. सावरकर जयंतीनिम्मित कुडाळात 28 ला वक्तृत्व स्पर्धा
swt१२६.jpg
०२३१२
स्वा. विनायक सावरकर
स्वा. सावरकर जयंतीनिम्मित
कुडाळात २८ ला वकृत्व स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ः महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, कुडाळ शाखेच्या साहित्य समितीच्यावतीने बॅरिस्टर नाथ पै विद्यालयात २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिम्मित दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा तालुका मर्यादित सर्वांसाठी खुली आहे. शालेय गट-नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थी-विद्यार्थिनी (शाळेचे ओळखपत्र आवश्यक), खुला ग-१८ वर्षावरील स्त्री-पुरुष. प्रत्येक स्पर्धकासाठी ७ मिनिटांची वेळ राहील.
विषय-शालेय गटः मला समजलेले सावरकर, सावरकरांचे मराठी भाषेसाठी योगदान, सावरकरांची अंदमानातील कारकीर्द. खुला गट विषयः माझी जन्मठेप पुस्तकाचे रसग्रहण, हिंदुत्ववादी सावरकर, ने मजसी ने परत मातृभूमीला. पारितोषिकेः शालेय गट व खुल्या गटातील अनुक्रमे तिघांना व उत्तेजनार्थ २ क्रमांक असे एकूण प्रत्येक गटासाठी ५ याप्रमाणे दोन्ही गटासाठी एकूण १० पारितोषिके देण्यात येतील. पारितोषिक रक्कमः २५०१, २००१, १५०१ व उत्तेजनार्थ दोन क्रमांकासाठी प्रत्येकी १०००. सहभागी स्पर्धकांस प्रमाणपत्र देण्यात येईल.
या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अमोल करंदीकर यांच्याशी २५ मेपर्यंत संपर्क साधून नोंदणी करावी. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, सिंधुदुर्ग शाखा कुडाळच्यावतीने केले आहे.