
बारसूत पोलिसांनी राबवली स्वच्छता मोहीम
५ (टुडे पान १ साठी)
-rat१२p२.jpg-
२३M०२२८५
रत्नागिरी ः राजापूर-बारसू येथे प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा गोळा करताना पोलिस.
---
बारसूत पोलिसांची स्वच्छता मोहीम
आंदोलनादरम्यान कचरा ; प्लास्टिक बाटल्या, पिशव्यांचा खच
रत्नागिरी ः राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणाचे काम बारसूमध्ये सुरू असल्याने त्या ठिकाणी गेले काही दिवस आंदोलने सुरू होती. या भागात ग्रामस्थांसह पोलिस व बाहेरून आलेल्या लोकांकडून टाकलेल्या प्लास्टिक बॉटलचा कचरा पडला होता. हा कचरा जिल्हा पोलिस दलातील बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिस यंत्रेणेने या भागातील साफसफाई मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.
मागील काही दिवसांपासून बारसू पंचक्रोशी परिसरात रिफायनरी प्रकल्पसाठी माती परीक्षण सुरू होते. या वेळी ग्रामस्थांनी आंदोलने केली. या बंदोबस्तासाठी जिल्हा पोलिस यंत्रणाही मोठ्या प्रमाणात कामाला लागली होती. प्रचंड उकाड्याचा दिवस असल्याने पाण्याच्या बॉटलचा सर्रास वापर करण्यात येत होता. पाणी प्यायल्यानंतर रिकाम्या झालेल्या बाटल्या नागरिक, ग्रामस्थ तसेच या यंत्रणेतील लोकांनी त्याच भागात टाकून दिल्या होत्या. त्यामुळे परिसरात कचरा दिसत होता. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी बारसू परिसरात स्वच्छता उपक्रम राबवून टाकण्यात आलेले प्लास्टिक गोळा केले.