गौतमी नदीत कोल्हापूर बंधाऱ्याचे काम सुरू

गौतमी नदीत कोल्हापूर बंधाऱ्याचे काम सुरू

६ (टुडे पान १ साठी)


-rat१२p१७.jpg ः
२३M०२३२०
पावस ः पावस येथील गौतमी नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम सुरू
--

गौतमी नदीत बंधाऱ्याचे काम सुरू

कोल्हापूर पद्धतीचा ; गाळ उपसाही ; पाणलोट क्षेत्रात होणार वाढ

पावस, ता. १२ ः पावस येथील गौतमी नदीपात्रातील गाळ उपशाबरोबरच केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या कामाला सुरवात करण्यात आली. त्यामुळे नदीपात्र खोल होण्याबरोबरच पाणी साठवलेही जाणार असल्याने उन्हाळ्यात या भागातील विहिरींच्या पाण्याची पातळी स्थिर राहण्यास मदत होणार आहे.
या गौतमी नदीवर दरवर्षी कृषी विभाग व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दरवर्षी वनराई बंधारे बांधले जातात. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी व नदीकिनारी असलेल्या पाणीयोजनेच्या विहिरीला पाण्याची पातळीत स्थिरता यावी याकरिता केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर पद्धतीच्या बंधाराच्या कामाकरिता २ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. त्या कामाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. कोणत्याही क्षणी पावसाची शक्यता असल्याने बंधाऱ्याच्या कामाला तातडीने सुरवात करण्यात आली. या बंधाऱ्यामुळे पाण्याच्या विपुल साठा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू असल्यामुळे पाणलोट क्षेत्रातही वाढ होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com