रत्नागिरी-सुधारित बातमी

रत्नागिरी-सुधारित बातमी

सिग्नलचे चित्र वापरावे..

सिग्नल यंत्रणेच्या कामाला मिळणार ठेकेदार

रत्नागिरी पालिकेच्या निविदेला प्रतिसादच नाही ; ४७ लाख मंजूर, फेरनिविदा काढण्याची वेळ

रत्नागिरी, ता. १२ ः शहर वाहतुकीला शिस्त लागावी, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काही वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे; मात्र ही यंत्रणा विविध कारणांमुळे कित्येक वर्षे बंद आहे. नुकत्याच या सिग्नल यंत्रणेसाठी जिल्हा नियोजनमधून सुमारे ४७ लाख ३ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी १० दिवसांपूर्वी पालिकेच्यावतीने निविदा काढण्यात आली होती; मात्र या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने आता फेरनिविदा काढण्यात आली आहे.
वाढत्या शहरीकरणाबरोबर शहरात रहदारीही वाढत आहे. यामुळे शहरातील प्रमुख ठिकाणी वाहतुकीच्या वर्दळीचे नियमन करण्यासाठी सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी होत होती. यालाच अनुसरून रत्नागिरी पालिकेच्या २५ फेब्रुवारी २०२२ ला जिल्हा नियोजन समितीकडे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित व नूतनीकरण करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. याला २५ फेब्रुवारी २०२३ ला १ वर्ष झाले. जिल्हा नियोजन समितीकडून २० मार्चला सिग्नल यंत्रणेसाठी जुन्या सिग्नल यंत्रणेच्या जागी नवीन आधुनिक एलईडी सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. त्यापैकी २८ लाख २० हजार इतका निधी वितरित झाला आहे. शहरातील जयस्तंभ, जेलनाका, मारूती मंदिर सर्कल, रामनाका, गोखलेनाका या भागात ही सिग्नल व्यवस्था उभारण्यात येणार आहे. यासाठीच पालिकेच्यावतीने पहिली निविदा काढण्यात आली होती; मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढण्याची वेळ पालिकेवर आली आहे.
----------
चौकट-
सिग्नलचे ठिकाण*मंजूर निधी*वितरित निधी
जयस्तंभ चौक*२,७१,५१३*७,६५,०००
जेलनाका*१०,७८,९४*६,४५,०००
मारूती मंदिर*१२,७४,७४१*७,६५,०००
रामनाका*१०,७८,०९२*६,४५,०००
---------------------
कोट...
सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी सध्या फेरनिविदा काढली आहे. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर वर्कऑर्डर काढली जाईल. त्यानंतरच शहरातील ४ ठिकाणी असणाऱ्या सिग्नल यंत्रणेच्या कामाला प्रत्यक्षपणे सुरवात होईल.
- तुषार बाबर, मुख्याधिकारी तथा प्रशासक रत्नागिरी पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com