आरोग्य कर्मचारी संघटनेचे एकतर्फी वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य कर्मचारी संघटनेचे एकतर्फी वर्चस्व
आरोग्य कर्मचारी संघटनेचे एकतर्फी वर्चस्व

आरोग्य कर्मचारी संघटनेचे एकतर्फी वर्चस्व

sakal_logo
By

02341
सिंधुदुर्गनगरी ः सर्व विजयी उमेदवारांसोबत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, सिंधुदुर्ग संघटनेचे पदाधिकारी.


आरोग्य कर्मचारी संघटनेचे एकतर्फी वर्चस्व

पंचवार्षिक निवडणूक; विरोधात असलेल्या १३ उमेदवारांचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १२ ः सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, सिंधुदुर्ग या संघटनेने एकतर्फी वर्चस्व राखले आहे. निवडणूक झालेल्या बाराही जागांवर या पॅनलचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत. विरोधात असलेल्या नर्सेस संघटना, कास्ट्राइब संघटना व अपक्ष असे मिळून १३ उमेदवारांचा पराभव झाला.
जिल्हा आरोग्य सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीसाठी ३९७ मतदार निश्चित झाले होते. यासाठी १४ संचालक निवडून द्यायचे होते. यातील औषध निर्माण अधिकारी या एका संचालक पदाची निवडणूक बिनविरोध झाली होती. प्रतापसिंह नागरे हे बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १३ जागांसाठी आरोग्य सेविका मतदारसंघ एका जागेसाठी विनिता मुंज विरुद्ध सायली कन्याळकर, आरोग्य सेवक दोन जागेसाठी अरुण गवस, बाबुराव वरक, शैलेश पेडणेकर, शिवाजीराव बोडेकर यांच्यात लढत झाली. आरोग्य सहाय्यक दोन जागांसाठी लीलाधर सोमजी, प्रसाद मांजरेकर, रवींद्र परब, भिकाजी कदम यांच्यात लढत झाली. आरोग्य सहाय्यिका या एका जागेसाठी अनामिका धुमाळे, क्षमा पुराणिक यांच्यात लढत झाली. आरोग्य पर्यवेक्षक एका जागेसाठी रुपेश नेर्लेकर व अनुसया धनवे यांच्यात निवडणूक झाली. इतर संवर्ग एका जागेसाठी रंजन वाळके आणि विद्या लाड, अनुसूचित जाती जमाती एका जागेसाठी अर्पिता साळुंके, संदेश रणसिंग, शंकर कदम निवडणूक रिंगणात होते. महिला प्रतिनिधी दोन जागांसाठी सुनयना मसगे, अपर्णा इंदप, सोनाली काटकर, आरती कामत यांच्यात लढत झाली. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी एका जागेसाठी संजीवनी काणेकर, सुशांत कामत यांच्यात तर भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग एका जागेसाठी वनिता गोसावी, उदय बुचडे, अविनाश धुमाळे यांच्यात लढत झाली.
--
चौकट
विजयी उमेदवार असे
यावेळी सायली कनयाळकर, मतदारसंघ आरोग्य सेवक (महिला), सोनाली काटकर, आरती कामत (महिला प्रतिनिधी), क्षमा पुराणीक (आरोग्य सहाय्यक, महिला), अरुण गवस, बाबुराव वरक (आरोग्य सेवक, पुरुष), नागेश सोमजी, प्रसाद मांजरेकर, (आरोग्य सहाय्यक, पुरुष), रुपेश नेर्लेकर (आरोग्य पर्यवेक्षक, पुरुष), रंजन वाळके (इतर संवर्ग), संदेश रणशिंग (अनुसूचित जमाती), उदय बुचडे (विशेष मागास प्रवर्ग), आणि सुशांत कामत (ओबीसी) हे उमेदवार विजयी झाले.
-------------
३६५ जणांनी केले मतदान
सिंधुदुर्गनगरी येथील संस्था कार्यालयात ११ मेस सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान झाले. ३६५ जणांनी मतदान केले. त्यानंतर याच ठिकाणी मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकृष्ण मयेकर यांनी काम पाहिले. हे यश मिळविण्यासाठी सर्व संघटना पदाधिकारी तसेच जिल्हा संघटक किशोर लाड, अध्यक्ष विनोद सावंत, उपाध्यक्ष कांचन वर्दम-मडगावकर, उपाध्यक्ष संजय करंगुटकर, सचिव प्रकाश तेंडोलकर, दिलीप मळये, संघटना ज्येष्ठ सदस्य, विद्यमान चेअरमन संजय नाईक आदींनी मेहनत घेतली.