नैतिकता सांगणाऱ्या ठाकरेंनी 
आमदारकीचा राजीनामा द्यावा

नैतिकता सांगणाऱ्या ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा

02349
नीतेश राणे


नैतिकता सांगणाऱ्या ठाकरेंनी
आमदारकीचा राजीनामा द्यावा

नीतेश राणे : राऊतांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ

कणकवली, ता. १२ : तत्‍कालीन राज्‍यपाल कोश्‍यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क करून दिला. त्‍यानंतरच ठाकरे यांना विधान परिषदेवर जाता आले. त्‍यामुळे आता नैतिकता सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आधी आपल्‍या आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली. तर संजय राऊत लवकरच पुन्हा तुरुंगात जातील, असे ते म्‍हणाले.
येथील प्रहार भवन येथे नीतेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे नैतिकता सांगू लागले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. मात्र, ठाकरे यांच्याकडे खरंच नैतिकता शिल्‍लक असेल, तर त्‍यांनी आधी आपल्‍या आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा. ते म्‍हणाले, ठाकरे यांना विधान परिषदेवर संधी मिळावी, यासाठी तत्‍कालीन राज्‍यपाल कोश्‍यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. ठाकरे यांच्याशीही मोदींचा संवाद साधून दिला. यावेळी ठाकरे यांनी केलेल्‍या विनंतीला मान देऊन मोदी यांनी निवडणूक आयोगाला निर्देश दिले. विधान परिषदेची निवडणूक लावण्यात आली. त्‍यामुळेच ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी राहण्याची संधी मिळाली. तसेच मातोश्री आणि ठाकरे यांच्या आणखी एका बंगल्‍याचे काम देवेंद्र फडणवीस यांनीच नियमित करून दिले होते. त्‍यामुळे फडणवीस यांच्यावर ठाकरे यांनी टीका करू नये. राणे म्‍हणाले, ‘भाजप नेत्‍यांवर सतत टीका करणाऱ्या संजय राऊतांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होणार असून राऊत हे पुन्हा जेलमध्ये दिसणार आहेत. भाजपचा नंगानाच, अशीही टीका संजय राऊत करत आहेत; पण आरे गेस्ट हाउसमध्ये रशियन नंगानाच कुणी केला होता हे आधी पहावे. कारण राऊतांना अक्कलदाढ अजून आलेली नाही.
--
ठाकरे यांच्याकडे आता कुठलाही पक्ष नाही
अंधेरी पोटनिवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने ठाकरे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव दिले होते. ते त्‍या निवडणुकीपुरतेच होते. आता ते शिवसेना नाव लावू शकत नाहीत. तसेच ठाकरे यांच्याकडे आता कुठलाही पक्ष राहिलेला नाही. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्‍यांनी ठरवलं तर ते उद्धव ठाकरे, आदित्‍य ठाकरे यांच्यावर कारवाई करू शकतात, असेही श्री. राणे म्‍हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com