चिपळूण-काडवली धरणग्रस्तांचे प्रश्न चर्चेने सोडवा

चिपळूण-काडवली धरणग्रस्तांचे प्रश्न चर्चेने सोडवा

- RATCHL१२१.JPG ःKOP२३M०२३०३ चिपळूण ः भूमिपूजनप्रसंगी विक्रांत जाधव व मान्यवर ग्रामस्थ.
-----------------

काडवली धरणग्रस्तांचे प्रश्न चर्चेने सोडवा

विक्रांत जाधव ; धरणकामाचे भूमिपूजन
चिपळूण, ता. १२ ः काडवलीत धरण व्हावे यासाठी धरणग्रस्त व ग्रामस्थ सकारात्मक आहेत; मात्र, धरणग्रस्तांचे प्रश्न चर्चेने सुटले पाहिजेत. यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी काडवली येथील धरणकामाच्या भूमिपूजनप्रसंगी केले.
खेड तालुक्यातील काडवली येथे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून धरण मंजूर झाले असून, या कामासाठी सुमारे ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत काडवली येथील धरणग्रस्त व ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली. या वेळी धरणग्रस्त व ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले तर गुरूवारी या धरणकामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्यासह सरपंच भक्ती महाडिक व प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या हस्ते झाले. या वेळी खेडचे माजी उपसभापती संतोष उतेकर, केळणे गावचे सरपंच संदीप कदम, काडवलीचे माजी सरपंच जगदीप महाडिक, रमेश मांजरेकर, माजी उपसरपंच राकेश महाडीक, माजी सदस्य मनोज काजवे, उपसरपंच रोहित आग्रे, विजय गजमल, मानसी महाडिक, खेमराज कन्स्ट्रक्शनचे संतोष चव्हाण आदी उपस्थित होते. दरम्यान, किशोर महाडीक, अंकुश जाधव यांनी काही प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांची उत्तरे जलसंधारण विभागाचे सागर भराडे यांनी दिली. त्याचबरोबर डांगेवाडी ग्रामस्थांच्यावतीने अंकुश जाधव यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांना धरणग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात निवेदन दिले. प्रास्ताविक सरपंच भक्ती महाडीक यांनी तर सूत्रसंचालन उपसरपंच रोहित आग्रे व आभार माजी सरपंच जगदीप महाडिक यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com