दोन लाख महिलांनी एसटीने केला प्रवास

दोन लाख महिलांनी एसटीने केला प्रवास

२७ (पान २ साठी, अॅंकर)


-rat१२p२४.jpg ः
२३M०२३५८
गुहागर बसस्थानक
---
दोन लाख महिलांनी एसटीने केला प्रवास

रवींद्र वणकुद्रे ; गुहागर आगाराचे भारमान वाढले

गुहागर, ता. १२ ः गुहागर आगारातील एसटीमधून मार्च महिन्यात १ लाख महिलांनी प्रवास केला तर एप्रिल महिन्यात ही संख्या २.५ लाखाहून अधिक होती. तर शिमगोत्सवाच्या काळात ७ लाख प्रवाशांनी एसटीला पसंती दिली. कोरोना महामारी आणि कामगारांच्या संपानंतर गुहागर आगार पुन्हा ग्राहकांना एसटीकडे वळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती गुहागरचे प्रभारी आगारप्रमुख रवींद्र वणकुद्रे यांनी पत्रकारांना दिली.
गुहागर आगारात आज प्रवाशांसाठी मोफत स्वच्छ व थंड पेयजल सुविधेचे उद्‌घाटन दोन ज्येष्ठ प्रवाशांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेसाठी नासिम मालाणी यांनी संपूर्ण सहकार्य केले. उद्‌घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना वणकुद्रे म्हणाले, गुहागर आगारात ६८ एसटी बस आणि २ मिनीबस आहेत. सर्व एसटी बस उत्तम स्थितीत असून रस्त्यावर धावत आहेत. गुहागर आगारातील एसटीच्या फेऱ्या प्रतिदिन २४ हजार किमी पूर्ण करतात. सध्या काही शालेय फेऱ्या सोडल्यास सर्व मार्गावर वहातूक सुरळीत सुरू आहे. १५ ऑगस्ट २०२२ ला ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना सुरू झाली तर १८ मार्च २०२३ ला महिला सन्मान योजना सुरू झाली. या दोन योजनांमुळे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
शिमगोत्सवाच्या काळात मार्च महिन्यात एकूण ७ लाख ३७ हजार ९५० प्रवाशांनी एसटीने प्रवास केला. त्यामध्ये महिलांची संख्या १ लाख, ८ हजार २३६ होती. एप्रिल महिन्यात ६ लाख ६४ हजार २५२ भारमान होते. परीक्षेचा हंगाम असल्याने एकूण प्रवाशीसंख्येत ७३ हजारने घट झाली होती. तरीदेखील महिला प्रवाशांची संख्या २ लाख ५६ हजार ५२५ इतकी होती. याचा अर्थ योजना जाहीर झाल्यानंतरच्या महिन्यात महिला प्रवाशांच्या संख्येत दीड लाखाने वाढ झाली आहे. मे महिन्यात या संख्येत आणखी वाढ होईल.
-
कोट
प्रदीर्घ कालावधीनंतर ग्रामीण भागातील जनता एसटीने प्रवास करू लागली आहे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सद्यःस्थितीत असलेल्या सर्व गाड्या चालू असल्या तरी आम्हाला अजूनही १० ते १५ गाड्यांची आवश्यकता आहे. आज ४०८ चालक-वाहक कार्यरत असून, १३७ चालक-वाहकांची कमी आहे. अशा स्थितीतही प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न गुहागर आगारातील कर्मचारी करत आहेत.
--रवींद्र वणकुद्रे, गुहागर आगारप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com