कुडाळ सरपंच संघटना
अध्यक्षपदी राजन परब

कुडाळ सरपंच संघटना अध्यक्षपदी राजन परब

कुडाळ सरपंच संघटना
अध्यक्षपदी राजन परब
माणगाव, ता. १२ ः कुडाळ तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी कसाल सरपंच राजन परब यांची, तर सचिवपदी वसोली सरपंच अजित परब यांची एकमताने निवड झाली. कुडाळ पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील सरपंचाची सभा नुकतीच पार पडली. यावेळी या निवडी झाल्या.
जिल्ह्यातील पहिली सर्वपक्षीय सरपंच संघटना कुडाळ सरपंचांनी तयार करून जिल्ह्यात आदर्श घालून दिला आहे. आतापर्यंत तालुकावार संघटना तयार झाल्या; पण त्या कोणत्या तरी पक्षाशी बांधील राहून स्थापन करण्यात आल्या; परंतु कुडाळ तालुका सरपंच संघटना ही पक्षविरहित स्थापन करून एक आदर्श घालून दिला. सरपंचांच्या समस्या शासन दरबारी मांडता याव्यात, नवीन सरपंचांना मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करणे, सरपंचांना जाणूनबुजून कोण त्रास देत असेल तर त्यांच्या पाठीशी उभे राहणे, कामकाजात एकमेकांना मदत करणे, या उद्देशाने संघटनेची स्थापना केली आहे, असे परब यांनी सांगितले. कार्यकारिणी अशी ः उपाध्यक्ष- शीतल कल्याणकर, (कडावल सरपंच), सह सेक्रेटरी-सृष्टी कुडपकर (बिबवणे सरपंच), खजिनदार- अजय आकेरकर (पिंगुळी सरपंच), सल्लागार- कीर्ती तेरसे (निरुखे सरपंच), मिलिंद नाईक (तुळसुली सरपंच). कार्यकारिणी सदस्य- परशुराम परब, महेंद्र पिंगूळकर, दक्षता मेस्त्री, सोनल शिरोडकर, कावेरी चव्हाण, साधना परब, मनीषा भोसले, पूर्वा सावंत, भक्ती घाडीगावकर, वैशाली पावसकर यांची निवड केली. अजित परब यांनी प्रस्ताविक केले. राजन परब यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com