रत्नागिरी ः काजूच्या सर्वंकष विकासासाठी 53 कोटीचा आराखडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः काजूच्या सर्वंकष विकासासाठी 53 कोटीचा आराखडा
रत्नागिरी ः काजूच्या सर्वंकष विकासासाठी 53 कोटीचा आराखडा

रत्नागिरी ः काजूच्या सर्वंकष विकासासाठी 53 कोटीचा आराखडा

sakal_logo
By

KO20A66945
---
काजूच्या विकासासाठी ५३ कोटीचा आराखडा

फळपिक विकास योजना लागू ः जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनाला साडेसोळा कोटी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः काजू पिकाच्या सर्वंकष विकासासाठी काजू फळपिक विकास योजना लागू केली असून, त्यात रत्नागिरीसह कोकणातील पाच जिल्हे आणि चंदगड, आजरा हे कोल्हापूरमधील दोन तालुके समाविष्ट आहेत. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा ५३ कोटीचा आराखडा तयार झाला आहे. यामध्ये सर्वाधिक निधी जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनासाठी साडेसोळा कोटी रुपये ठेवण्यात आला असून ४५ हजार ४७८ जणांना लाभ दिला जाणार आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेमार्फत खासगी क्षेत्रातील रोपवाटिका स्थापन व बळकटीकरणासाठी अनुदान किमान ५० गुंठे ते जास्तीत जास्त एक हेक्टर क्षेत्र अनुदान ७ लाख ५० हजार रुपये प्लास्टिक आच्छादनासह शेततळे सुविधासाठी अनुदान प्लास्टिक आच्छादन ७५ हजार रुपये देण्यात येते. काजू योजनेंतर्गत जिल्ह्याचा आराखडा कृषी विभागाकडून तयार करण्यात आला आहे. यामध्ये रोपवाटिकेसाठी ६० लाख रुपये, काजू कलमांसाठी २ कोटी २५ लाख, प्लास्टिक आच्छादनासह शेततळे ९३ लाख ७५ हजार, सिंचनाकरिता विहीर ६ कोटी २५ लाख, टिमॉस्कुटो नियंत्रणाकरिता पिकसंरक्षण ५ कोटी ५९ लाख, काजूबागेमधील तणनियंत्रण ३ कोटी, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन १६ कोटी ५० लाख, काजू तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण १ कोटी ५० लाख, काजूप्रक्रिया उद्योग आधुनिकीकरण ४ कोटी १ लाख, पॅकहाऊस व ड्रॉईंग यार्ड ९ कोटी, काजूबोंडावर प्रक्रियेकरिता ३ कोटी आणि ओले काजूगर काढणी व प्रक्रियेसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्‍यांनी महाटीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज हा महा ई-सेवा केंद्र किंवा कृषी विभागाच्या तालुकास्तरीय कार्यालयातून करता येतील. त्यासाठी अर्जासोबत सातबारा, ८ अ, बॅंकपासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, आधारकार्ड आदी कागदपत्रे जोडून अर्ज ऑनलाईन करायचा आहे.

चौकट
योजनेतून मिळणारे अनुदान
* सिंचनाकरिता विहीर २ लाख ५० हजार
* कृषी यांत्रिकीकरण योजना १८ हजार प्रतियुनिट
* फलोत्पादन विकास अभियान ५० टक्के व २० हजार प्रति हेक्टर
* कृषी व अन्नप्रक्रिया कमाल १० लाख
* पॅकहाउस व ड्रॉईंग यार्ड १० लाख

कोट
काजू लागवडीसह प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी शासनाने ही योजना लागू केली आहे. याचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी घ्यावा. काजू बी बरोबर बोंडावरील प्रक्रियेलाही चालना दिली गेली आहे.
- सुनंदा कुऱ्‍हाडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी

चौकट २
तालुका* भौतिक लक्ष* निधी (रु.)
मंडणगड*५०२३* ५ कोटी ५१ लाख
दापोली*५०५४*६ कोटी ८९ लाख
खेड*५०४०*५ कोटी ७१ लाख
गुहागर*५०३९*५ कोटी ६४ लाख
चिपळूण*५०४०*५ कोटी ७१ लाख
संगमेश्वर*५०५०*५ कोटी ७१ लाख
रत्नागिरी*५११७*६ कोटी ३७ लाख
लांजा*५०६३*६ कोटी ३३ लाख
राजापूर*५०५२*५ कोटी ७३ लाख