अडूरमधील तरुणाने केली आत्महत्या

अडूरमधील तरुणाने केली आत्महत्या

26 (पान 3 साठी)

-rat12p28.jpg ः
23M02393
अनिकेत नार्वेकर
---------
अडूरमधील तरुणाची आत्महत्या

गुहागर, ता. 12 ः तालुक्यातील अडुर पड्याळवाडीतील तरुणाने 11 मे रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिकेत सुभाष नार्वेकर (वय 29) असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत नार्वेकर हे चालक म्हणून काम करत होते. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. या घटनेचा अधिक तपास गणेश कादवडकर करत आहेत. हेदवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर अनिकेतचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी अडूरमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिकेतच्या घराजवळच श्री पड्याळदेव मंदिरात सत्यनारायणाची महापूजा आणि पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या घटनेमुळे पड्याळवाडीवर शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com