सिंधुदुर्गनगरीत बुधवारी ऑनलाईन रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरीत बुधवारी ऑनलाईन रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरीत बुधवारी ऑनलाईन रोजगार मेळावा
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः खासगी क्षेत्रातील कारखाने उद्योग, व्यापार, उद्योजक, दुकाने, शॉप्स व इतर व्यवसायांना सद्यस्थितीत मनुष्यबळाचा तुटवडा भासत आहे, ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे बुधवारी (ता.१७) ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी ही माहिती दिली.
उद्योजकांना आवश्यक असलेल्या रिक्तपदांची माहिती त्यांच्या लॉगिनने ऑनलाईन पोस्ट करण्याची सुविधा कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्या उद्योग आस्थापनांनी या पोर्टलवर नोंदणी केलेली नाही; परंतु, त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे, अशा उद्योजकांनी प्रथम वरील पोर्टलद्वारे आपली नोंदणी करून रिक्तपदे पोस्ट करावीत. जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यातील उद्योजकांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये आपली रिक्तपदे अधिसूचित केलेली आहेत. नोकरी साधक (Job Secker) उमेदवारांनी वरील पोर्टलवर आपल्या स्वतःच्या लॉगिन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांना उद्योजक मुलाखतीसाठी ऑनलाईन तारीख व वेळ देऊन मुलाखत ऑनलाईन घेऊन अंतिम निवड करतील किंवा त्यांच्या अटीशर्तीनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवून अंतिम निवड करू शकतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक, तसेच उमेदवारांनी ऑनलाईन व्हर्च्युअल रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, तसेच अधिक माहितीसाठी sindhudurgrojgar@gmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्री. बिटोडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com