आसोली येथे उद्या कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आसोली येथे उद्या कार्यक्रम
आसोली येथे उद्या कार्यक्रम

आसोली येथे उद्या कार्यक्रम

sakal_logo
By

आसोली येथे उद्या कार्यक्रम
वेंगुर्ले ः आसोली (ता.वेंगुर्ले) गावात धुरी बांधवांचा श्री कुळ व परिवार देवता सग्रह सवास्तू संप्रोक्षण विधी सोहळा श्री धुरी मूळ पुरुष मंदिरात रविवारी (ता.१४) होणार आहे. यानिमित्त सकाळी आठला श्री देव नारायण पंचायतन देवतांचे श्री धुरी मूळ पुरुष मंदिरात आगमन व स्वागत, सकाळी नऊला धार्मिक विधी, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी एकला महाआरती, दुपारी दोनला महाप्रसाद होणार आहे. रात्री साडेनऊला कसई - दोडामार्ग येथील श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे, असे आसोली आणि मुंबई येथील श्रीदेव धुरी मूळ पुरुष मंदिर जीर्णोद्धार कमिटीने कळविले आहे.
---------------
आरोंदा येथे आज नाटक
आरोंदा, ता. १२ ः आरोंदा-सावरजुवा येथे उद्या (ता.१३) धार्मिक कार्यक्रमानिमित्त सकाळी विविध धार्मिक विधी. सायंकाळी भजन रात्री साडेनऊला कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे टिकसिनयुक्त अजिंक्यतारा भाग २ हे नाटक होणार आहे.