मडुऱ्यात बिबट्याचा गायीवर हल्ला गोठ्यात बिबट्याचा गायीवर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मडुऱ्यात बिबट्याचा गायीवर हल्ला
गोठ्यात बिबट्याचा गायीवर हल्ला
मडुऱ्यात बिबट्याचा गायीवर हल्ला गोठ्यात बिबट्याचा गायीवर हल्ला

मडुऱ्यात बिबट्याचा गायीवर हल्ला गोठ्यात बिबट्याचा गायीवर हल्ला

sakal_logo
By

02441
मडुरा ः डीगवाडीत गोठ्यात घुसून बिबट्याने गायीला जखमी केले.

मडुऱ्यात बिबट्याचा गायीवर हल्ला

प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला; थेट गोठ्यात घुसल्याने चिंता कायम

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ ः मडुरा-डीगवाडी येथील शेतकरी नाना वेंगुर्लेकर यांच्या घराशेजारील गोठ्यात घुसून बिबट्याने गायीवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात बिबट्याने गायीच्या तोंडावर ओरबाडा घेऊन जखमी केले. ग्रामस्थ बाबू वेंगुर्लेकर यांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच बिबट्याला हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, परिसरात बिबट्याचा धोका कायम आहे. हा प्रकार काल (ता.११) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की ः मडुरा-डीगवाडी येथे शेतकरी वेंगुर्लेकर यांचा घरालगतच गोठा आहे. रात्री ८.३० च्या सुमारास बिबट्या भरवस्तीमधील गोठ्यात घुसला. त्यामुळे गाय मोठमोठयाने हंबरु लागली. गायीच्या हंबरण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ बाबू वेंगुर्लेकर गोठ्यापाशी गेले. बिबट्या गायीवर हल्ला करीत असल्याचे त्यांनी पाहिले. प्रसंगावधान दाखवित धैर्याने त्यांनी बिबट्याला तेथून हुसकावून लावले. याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी गर्दी केली. माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वालावलकर यांनी बांदा पोलीस व वनविभागाला या हल्ल्याची माहिती दिली. वनरक्षक आप्पासो राठोड रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले. संतप्त ग्रामस्थांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. बांदा पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
----------
चौकट
बंदोबस्ताची मागणी
तांबळघाटी परिसरात वाहनचालकांना सातत्याने बिबट्याचे दर्शन होते. मात्र, आता बिबट्या थेट वस्तीत घुसल्याने स्थानिकांची चिंता वाढली आहे. परिसराला बिबट्याचा धोका कायम आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.