-चिपळुणात दोन दिवस पाणीपुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-चिपळुणात दोन दिवस पाणीपुरवठा बंद
-चिपळुणात दोन दिवस पाणीपुरवठा बंद

-चिपळुणात दोन दिवस पाणीपुरवठा बंद

sakal_logo
By

३४ (पान ३ साठी)

चिपळुणात १५, १६ ला पाणीपुरवठा बंद

चौपदरीकरणाचे काम ; जलवाहिनीचे करणार स्थलांतर

चिपळूण, ता. १२ ः चिपळूण पालिकेची शालोम हॉटेल ते राज मोटार गॅरेज दरम्यान असलेली जलवाहिनी सोमवार (ता. १५) व मंगळवार (ता.१६) मे रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाहेर स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे बहादूरशेख नाका ते पॉवरहाऊस महामार्ग परिसरासह अर्ध्या शहराला पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
सध्या शहरात चौपदरीकरणा अंतर्गत काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामात सुरवातीपासून महामार्गालगत असलेली पालिकेची पाईपलाईन त्रासदायक ठरली. अनेकदा मुख्य पाईपलाईनला गळती लागली. त्यामुळे दुरुस्तीची कामे करण्यात आली. मात्र त्यानंतर पाईपलाईन तशीच ठेवून उर्वरित काम करण्यात आले. मात्र आता सर्व्हिस रोडचे सुरू झाल्याने पुन्हा एकदा या कामात पाईपलाईनचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यासाठी ही मुख्य पाईपलाईन स्थलांतर करावी लागणार आहे. त्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्याप्रमाणे पालिकेने सोमवार व मंगळवार असे दिवस कामाचे नियोजन केले आहे. या कालावधीत बहादूरशेख नाका ते पॉवरहाऊस महामार्ग परिसरासह परशुराम नगर, बेबल कॉलनी, रॉयल नगर, विरेश्वर कॉलनी आदी ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.