अचानक जनावरे दगावल्याने खळबळ

अचानक जनावरे दगावल्याने खळबळ

अचानक जनावरे दगावल्याने खळबळ

फोंडाघाटमधील प्रकार; विषबाधा झाल्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १२ ः तालुक्यातील फोंडाघाट-गांगोवाडी येथे तीन जनावरांचा अचानक मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी कृषी सभापती संदेश पटेल यांनी फोंडा-कणकवली येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना फोनवरून पाचारण केले; मात्र ते येण्यापूर्वीच बाळा खांबाळेकर यांचा बैल, अशोक जोईल यांची गाय आणि बाळकृष्ण सावंत यांची गाय मृत झाली. आणखी दोन जनावरे अत्यवस्थ आहेत. ही घटना काल (ता.११) सायंकाळी उशिरा घडली. दरम्यान, या जनावरांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश चौगुले यांनी व्यक्त केला.
गांगोवाडीतील शेतकरी आपली जनावरे नेहमीप्रमाणे माळरानावर चरावयास सोडतात. काल सोडलेली जनावरे सायंकाळी अत्यवस्थ दिसू लागली. त्यामुळे शेतकऱ्यांत घबराट पसरली. तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना फोनवरून पाचारण करण्यात आले; मात्र, ते येण्यापूर्वीच बाळा खांबाळेकर यांचा बैल, अशोक जोईल यांची गाय आणि बाळकृष्ण सावंत यांची गाय मृत झाली. विलास गुरव आणि दामोदर सावंत यांच्या अत्यवस्थ जनावरांवर तातडीने औषधोपचार करून ती निगराणीखाली ठेवण्यात आली. या जनावरांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. युरियासदृश्य पदार्थ खाल्ल्याने जनावरांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश चौगुले यांनी व्यक्त केला. त्यांच्यासोबत डॉ. किरण वैद्य, डॉ. नातू, परिचारक गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले. पुढील आठ दिवसात जनावरांना चरण्यासाठी न सोडता, बांधून ठेवावे अशी दवंडी देण्याची सूचना शेतकऱ्यांना आणि ग्रामपंचायतीला त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनीही सतर्क राहावे. गुरांमध्ये रोगाची लक्षणे दिसताच तातडीने पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन फोंडाघाट पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com