३७ लाखांची दारू पत्रादेवी येथे पकडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३७ लाखांची दारू 
पत्रादेवी येथे पकडली
३७ लाखांची दारू पत्रादेवी येथे पकडली

३७ लाखांची दारू पत्रादेवी येथे पकडली

sakal_logo
By

02479
पत्रादेवी (गोवा) ः येथे पकडलेल्या मुद्देमालसह गोवा अबकारी खात्याचे अधिकारी व कर्मचारी.

३७ लाखांची दारू
पत्रादेवी येथे पकडली

गोवा अबकारी खात्याची कारवाई

बांदा,ता.१२ ः गोव्याहून मुंबईच्या दिशेने ट्रकमधून बेकायदा होणाऱ्या दारू वाहतुकीवर गोवा अबकारी खात्याच्या पथकाने पत्रादेवी तपासणी नाक्यावर कारवाई करत २२ लाख रुपये किमतीच्या दारुसह एकूण ३७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज सायंकाळी उशिरा झाली.
कर्नाटक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गोवा अबकारी तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी सुरू होती. सायंकाळी उशिरा नाक्यावर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला (एमएच ११ बीएल ९८८४) तपासणीसाठी थांबविण्यात आले. पाठीमागील हौद्यात सिमेंटचे ब्लॉक भरले होते. अबकारी खात्याच्या पथकाला संशय आल्याने गाडीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी गाडीत गोवा बनावटीच्या दारूचे खोके मोठ्या प्रमाणात भरलेले आढळले. पथकाने २२ लाख रुपये किमतीची दारू व १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ३७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अबकारी निरीक्षक कमलेश माजिक यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.