नाथ पै सेंट्रल स्कूलचे
सीबीएसई परीक्षेत यश

नाथ पै सेंट्रल स्कूलचे सीबीएसई परीक्षेत यश

02545
चेतन चेंदवणकर, हर्ष अटक, नूपुर सातार्डेकर

नाथ पै सेंट्रल स्कूलचे
सीबीएसई परीक्षेत यश
कुडाळ ः येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलचा दहावीचा निकाल १००, तर बारावीचा निकाल ७५ टक्के लागला. बारावीतून चेतन चेंदवणकर, तर दहावीतून हर्ष अटक, नूपुर सातार्डेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सीबीएसई बोर्ड २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमधून दहावीतून नेहा इन्सुलकर (९१), गौरी सावंत (८७.६) यांनी, तर बारावी परीक्षेत नवेंदू बांबार्डेकर (६९) व लतिका राणे (६१.४ टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष उमेश गाळवणकर, सीईओ अमृता गाळवणकर, मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे-खोत, उपमुख्याध्यापक विभा वझे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.
.................
वालावलला २२ रोजी डान्स स्पर्धा
कुडाळ ः वालावल येथील श्री देवी भावई मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त भावई मित्रमंडळातर्फे २२ ला जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी ७,७७७, ५,५५५, ३,३३३ रुपये व प्रत्येकी चषक तसेच उत्तेजनार्थ बक्षीस व चषक देण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला मंडळाकडून सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धा सायंकाळी ७.३० ला भावई पटांगणावर सुरू होईल. चिठ्ठी काढून स्पर्धकांना जो नंबर मिळेल, त्या नंबरला डान्स करायचा आहे. मंदिर परिसर पावित्र्य राखून नृत्य असावे. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या ३० स्पर्धकांना सहभाग देण्यात येईल. या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com