
‘गुढीपूर कबड्डी लीग’चा ‘सुयश स्पोर्ट’ मानकरी
02546
पिंगुळी ः ‘गुढीपूर कबड्डी लीग’च्या विजेत्या सुयश स्पोर्ट संघाला चषक प्रदान करताना भगवान रणसिंग व अन्य.
‘गुढीपूर कबड्डी लीग’चा
‘सुयश स्पोर्ट’ मानकरी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः पिंगुळी-गुढीपूर (ता. कुडाळ) संघ आयोजित गुढीपूर कबड्डी लीग स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले. अंतिम सामना सुयश स्पोर्ट विरुद्ध मुन्ना फायटर या संघांत झाला. या सामन्यात सुयश स्पोर्ट संघ ‘गुढीपूर कबड्डी लीग २०२३’ चा मानकरी ठरला. संघ मालक संदेश रणसिंग व मंथन रणसिंग यांच्या नेतृत्वाखाली सुयश स्पोर्ट संघाने विजयश्री खेचून आणत आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला. सुयश स्पोर्ट संघाने ३१, तर मुन्ना फायटर संघाने २३ पॉईंटस् कमावले. मुन्ना फायटर संघाने तब्बल पाच गुणांची आघाडी घेत विजयाचा मानकरी ठरला. अष्टपैलू खेळाडू म्हणून ‘सुयश स्पोर्ट’चा आनंद ठाकूर, उत्कृष्ट चढाई अथर्व रणसिंग यांना गौरविण्यात आले. गुढीपूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज अध्यक्ष भगवान रणसिंग, राजन सिंगनाथ, तुळशीदास मसके, राजा सिंगनाथ, गुढीपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.