विकेंड, उन्हाळी सुटीमुळे देवगडात पर्यटकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकेंड, उन्हाळी सुटीमुळे
देवगडात पर्यटकांची गर्दी
विकेंड, उन्हाळी सुटीमुळे देवगडात पर्यटकांची गर्दी

विकेंड, उन्हाळी सुटीमुळे देवगडात पर्यटकांची गर्दी

sakal_logo
By

वीकेंड, उन्हाळी सुटीमुळे
देवगडात पर्यटकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १३ ः तालुक्यात पुन्हा एकदा किनारी भागातील पर्यटन बहरले आहे. वीकेंड आणि उन्हाळी सुटी यामुळे कालपासूनच (ता. १२) रस्त्यावरील वर्दळीत वाढ झाली होती. खासगी वाहने घेऊन पर्यटक येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा येथील हॉटेल आणि खानावळी ‘हाउसफुल्ल’ झाल्या आहेत.
आता उन्हाळी सुटी असल्यामुळे तालुक्याच्या विविध ठिकाणची पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. येथील समुद्र किनाऱ्याबरोबरच तालुक्यातील किल्ले विजयदुर्ग, श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथे पर्यटकांची मोठी वर्दळ सुरू आहे. येथील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटकांची धांदल सुरू आहे. आज देवगड-नांदगाव या मुख्य रस्त्याबरोबरच किनारी भागातील रस्त्यांवर पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ जाणवत होती. त्यामुळे जामसंडे, तळेबाजार तसेच शिरगाव भागात वाहतूक कोंडीचे प्रकार घडत होते. येथील समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ दिसत होती. श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथेही दर्शनाबरोबरच किनारी पर्यटक फिरताना दिसत होते. येथील हॉटेल व्यावसायिकांची तारांबळ उडालेली दिसत होती. पुढील दोन दिवस तालुक्याच्या किनारी भागात पर्यटकांचा वावर जाणवणार असल्याची शक्यता दिसते. दोन दिवस सुटी असल्याने पर्यटन बहरण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या वाढत्या वर्दळीमुळे स्थानिक उलाढालीत वाढ होण्याचे संकेत आहेत.