सडेजांभारी शाळेचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सडेजांभारी शाळेचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात
सडेजांभारी शाळेचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात

सडेजांभारी शाळेचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात

sakal_logo
By

७ (पान ६ साठी)

सडेजांभारी शाळेचा अमृत महोत्सव

गुहागर, ता. १३ ः तालुक्यातील सडेजांभारी शाळा नं. २ चा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात झाला. या निमित्ताने विविध कार्यक्रम व साफुदपा डोनर सन्मान, माजी शिक्षक सन्मान, ज्येष्ठ नागरिक सन्मान, चंद्रकांत आलीम यांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यानिमित्त सकाळी बॅंजोपथकाद्वारे वाजतगाजत शोभायात्रा काढण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट लेझिम नृत्य व झांजपथक नृत्याने उपस्थितांचे स्वागत केले. सत्यनारायणाच्या महापूजेनंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर हळदीकुंकू समारंभ पार पडला. स्नेहभोजनाचा लाभ घेतल्यानंतर ज्येष्ठांचा गुणगौरव सोहळा पार पडला. या वेळी माजी शिक्षक पड्याळ गुरूजी, जनार्दन पालशेतकर गुरूजी, रमेश पालशेतकर, सुनील करंबेळे, धोंडू करंबेळे, करंबेळे बाई, बजरंग गुरसळे, संजय बैकर, प्रिया गुहागरकर, अनंत पागडे इ. माजी शिक्षक उपस्थित होते.
माजी शिक्षक यांनी १९७४ पासूनच्या शालेय आठवणी जागवल्या. शाळेचे मुख्याध्यापक उदय गोरीवले, पदवीधर शिक्षक, माजी प्र. केंद्रप्रमुख, आदर्श शिक्षक रवींद्र कुळये, उपशिक्षिका पल्लवी डिंगणकर यांचा ग्रामस्थांमार्फत सन्मान करण्यात आला. शेवटी साफुदपा डोनर सन्मान, माजी शिक्षक सन्मान, ज्येष्ठ नागरिक सन्मान, चंद्रकांत आलीम यांचा सन्मान करण्यात आला. शाळेसाठी वस्तूरूप, चित्ररूप, आर्थिक स्वरूपात देणगी देणाऱ्या देणगीदारांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर रात्री आजी-माजी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला. रात्री गणगौळण, वगनाट्याच्या बहारदार कार्यक्रमाने अमृत महोत्सवी सोहळ्याची सांगता झाली.
-----------------------------------