Sun, Sept 24, 2023

हडी-बौद्धवाडी येथे क्रिकेट स्पर्धा
हडी-बौद्धवाडी येथे क्रिकेट स्पर्धा
Published on : 13 May 2023, 10:33 am
हडी-बौद्धवाडी येथे क्रिकेट स्पर्धा
मालवण : भीमरत्न क्रीडा मंडळ व संजय कदम मित्रमंडळातर्फे हडी-बौद्धवाडी येथे आजपासून क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. रविवारी (ता. १४) पर्यंत दोन दिवसीय नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास ७ हजार रुपये, आकर्षक चषक, उपविजेत्या संघास ५ हजार रुपये, आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. इच्छुकांनी प्रज्वल कदम, तुषार कदम, रत्नदीप कदम, निनाद कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.