कासार्डे पिंपळेश्वर मंदिरात आजपासून वार्षिक महोत्‍सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासार्डे पिंपळेश्वर मंदिरात
आजपासून वार्षिक महोत्‍सव
कासार्डे पिंपळेश्वर मंदिरात आजपासून वार्षिक महोत्‍सव

कासार्डे पिंपळेश्वर मंदिरात आजपासून वार्षिक महोत्‍सव

sakal_logo
By

कासार्डे पिंपळेश्वर मंदिरात
आजपासून वार्षिक महोत्‍सव

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १३ : कासार्डे तर्फेवाडीतील पिंपळेश्‍वर मंदिरात १४ ते १६ मे या कालावधीत वार्षिक महोत्सव सोहळा होणार आहे. त्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महोत्सवात उद्या (ता. १४) रात्री आठला आचरा-देऊळवाडी येथील श्री विठ्ठल-रखुमाई दिंडी भजन सादर होणार आहे. सोमवारी (ता. १५) दुपारी ३ ला ‘श्रीं’ची महापूजा, सायंकाळी हळदीकुंकू, कुणकवणच्‍या रणरागिणी महिला ढोलपथकाचे ढोल वादन, रात्री ८ ते ९ दरम्यान महाप्रसाद होईल. रात्री ९ पासून भजनांचा डबलबारी तिरंगी सामना होणार आहे. शेळपी वेंगुर्लेचे बुवा दिनेश वागदेकर, नाडण देवगडचे बुवा संदीप पुजारे, पियाळीचे बुवा संतोष कानडे यांच्‍यात भजनाचा तिरंगी सामना रंगणार आहे. मंगळवारी (ता. १६) दहिकाला उत्सव होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन पिंपळेश्‍वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, गेली अनेक वर्षे स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’, ‘प्लास्टिक बंदी’, ‘एक पाऊल परिवर्तनाकडे’, ‘प्लास्टिक पिशवी वापरू नका, कापडी पिशवी वापरा’, ‘सकाळ’ वृत्तपत्राची प्रेरणा घेऊन दीडशे कापडी पिशव्‍या वाटण्‍यात आल्‍या. गुटखाबंदी, दारू बंदी, पाणी वाचवा, जल है तो कल है, बेटी पढाओ-बेटी बचाओ, झाडे वाचवा-झाडे जगवा यांसारखे संदेश व जनजागृतीवर अनेक कार्यक्रम राबविले.