
चिपळुणात आजपासून पहिला चित्रयज्ञ
९ (पान २ साठी)
- ratchl१३२.jpg, ratchl१३३.jpg ः
२३M०२५७०, २३M०२५७१
चिपळूण ः चित्रयज्ञात साकारण्यात येणारी चित्रे.
----
चिपळुणात आजपासून पहिला चित्रयज्ञ
सलग ४८ तास ; नामवंत कलाकारांचा सहभाग
चिपळूण, ता. १३ ः येथील हौशी चित्रकार संघटना आणि संस्कारभारती उत्तर रत्नागिरी जिल्हा आयोजित १४ ते १६ मे दरम्यान शहरातील गुरूदक्षिणा सभागृहात राज्यातील पहिला चित्रयज्ञ होणार आहे. प्रथमच सलग ४८ तास न थांबता साखळी पद्धतीने कलाकार आपली कला सादर करणार आहेत. राष्ट्रपती भवनात रांगोळी साकारणाऱ्या नंदू साळवींसह राज्यभरातील नामवंत कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत.
मूर्तिकला, मंडल आर्ट, नेलआर्ट, ओरिगामी, पपेट मेकिंग, क्लॉथ पेंटिंग, ओरिगामी, बॉटल आर्ट, टॅटू, रांगोळी, मेहेंदी यासारखे अनेक कलाप्रकार एकच ठिकाणी साकारणार आहेत. सर्वसाधारणपणे कलाकार एकांतात कला साकारतात; पण चित्रयज्ञमध्ये चिपळूणकरांना या कलांची निर्मिती प्रक्रिया प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. नागरिकांसाठी खरोखरच हा एक वेगळा अनुभव असणार आहे. यामध्ये वॉटरकलर, क्रीलिक, ऑईल कलर वगैरे विविध माध्यमातून काम होणार आहे. मूर्तिकला, पोर्ट्रेट, कागदकाम, अर्पचित्र, व्यंगचित्र, भरतकाम, कापडावर पेंटिंग, बॉटलआर्ट, स्टोनआर्ट, मण्डलआर्ट, वाळूशिल्प, गालिचा रांगोळी, पोर्ट्रेट रांगोळी, दुर्मिळ ड्रॉईंग अशा नानाविध कलाप्रकारात काम रसिकांना प्रत्यक्ष पाहता येणार आहे. यामध्ये पुणे, मुंबई, रत्नागिरी, दापोली, गुहागर, चिपळूणमधील अनेक नामवंत व हौशी चित्रकार सहभागी होणार आहेत.
चिपळूणमधील हौशी चित्रकार, कला शिक्षक, प्रथितयश कलाकार, कला वस्तू निर्माण करणारे कलाकार या सर्वांनी एकत्र येऊन हा चित्रयज्ञ साकारण्याचे ठरवले आहे. वर्षभर सुरू राहील अशी आर्टगॅलरी येथे सुरू केली जाणार असून, केतकर यांची ही कल्पना सर्वच चित्रकारांना आवडली. पोर्ट्रेट आर्टिस्ट नागवेकर, लॅन्डस्केप आर्टिस्ट विष्णू परीट, धुरी सर, सह्याद्री आर्ट स्कूलचे प्रकाश राजेशिर्के, माणिक यादव, डोंबिवलीचे सुप्रसिद्ध पोट्रेट चित्रकार संत असे नामवंत कलाकार या चित्रयज्ञात सहभागी होणार आहेत.