क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंच्या आठवणींना उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंच्या आठवणींना उजाळा
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंच्या आठवणींना उजाळा

क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंच्या आठवणींना उजाळा

sakal_logo
By

१२ (पान २ साठी, अॅंकर)


-rat१३p८.jpg-
२३M०२५६३
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे फडकेवाडी येथे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मानाचा चौथरा येथे फलकाचे अनावरण करताना सरपंच श्रावणी रांगणकर, जयंत फडके.
-rat१३p९.jpg-
२३M०२५६४
वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी माहिती देताना जयंत फडके आणि कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थ.
--

गणेशगुळ्यात क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंचा चौथरा

माहितीसाठी फलकाचे अनावरण ; आठवणींना दिला उजाळा

पावस, ता. १३ ः रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे-फडकेवाडीत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराचा चौथरा आहे. आजही ग्रामस्थ त्या चौथऱ्‍याचा मान ठेवतात, नारळ देतात. ११ मे रोजी वाडीत पूजा होती. त्यानिमित्ताने उपस्थित राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांना या चौथऱ्याची माहिती मिळाली. पुजेच्या निमित्ताने या चौथऱ्याच्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आला आणि क्रांतिकारकांच्या आठवणी जागवण्यात आल्या.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ गाव इथे आहे. कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी वासुदेवरावांचे आजोबा अनंतराव फडके यांच्याकडे होती. त्यामुळेच हे घर सोडून अनंतराव फडके कर्नाळा येथे गेले. अनंतराव खूप पराक्रमी होते. इंग्रजांविरुद्ध अखेरपर्यंत त्यांनी किल्ला लढवला होता. वासुदेवराव यांचे वडील बळवंतराव यांना सगळे सुभेदार म्हणत. शिरढोणच्या आजुबाजूची गावे अनंतरावांना इनाम मिळाली होती. अनंतरावांना ते कुर्धेचे आहेत याचा खूप अभिमान होता. आपली ओळख ते कुर्धेकर अशीच करून देत असत. अनंतराव फडके जिथे राहात होते, त्या चौथऱ्याची माहिती आणि वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दलची माहिती पुढील पिढीला मिळावी, म्हणून सरपंच श्रावणी रांगणकर यांच्या हस्ते येथे दीपप्रज्वलन व फलक अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक परिचय समितीच्या विभाग संपर्कप्रमुख संजना मराठे यांनी केले. शमिका गद्रे शहर कार्यवाहिका यांनी स्वागत केले. जुई डिंगणकर हिने वैयक्तिक गीत सादर केले. राज्यशास्त्राचे अभ्यासक जयंत फडके यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे चरित्र आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीत उलगडून दाखवले. स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येयवेड घेऊन अतिशय कष्ट झेलत वासुदेव बळवंत यांनी प्राणांची आहुती दिल्याचे सांगितले. वेदमंत्राहून आम्हा हे सांघिक गीत अनुराधा ताटके यांनी म्हटले. उमा दांडेकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अधिवक्ता आणि रेणुका प्रतिष्ठानच्या सचिव मानसी डिंगणकर यांनी केले. संपूर्ण वन्दे मातरम झाले. भारतमाता की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमला गेला.
--