ःशेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धरावी

ःशेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धरावी

१९ (पान ५ साठी)


-rat१३p१४.jpg ः
२३M०२५६५
राजापूर ः शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना रेशीम शेतीतज्ञ महेश सावंत. शेजारी दीपाली पंडित, विद्या पाटील, डॉ. भारती वरेकर, वासुदेव घाग आदी.
-----------

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धरावी

महेश सावंत ; ओणीत शेतकरी मेळावा


राजापूर, ता. १३ ः कोकणात रेशीम शेती होत नाही हे चुकीचे आहे. राजापूर-लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोकणातही रेशीम शेती उत्तम पद्धतीने होऊ शकते, हे स्वतः रेशीम शेती करून साऱ्यांना दाखवून दिले आहे. ही कोकणवासियांच्यादृष्टीने कौतुकास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार रेशीम शेतीतज्ञ महेश सावंत यांनी काढले. या वेळी त्यांनी रेशीम शेतीमध्ये आर्थिक स्तर उंचावण्याची क्षमता असून त्याची साऱ्‍यांनी कास धरण्याचे आवाहनही केले.
राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित, राजापूरच्या वतीने रेशीम शेतीसंबंधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ओणी येथील विमलेश्वर सभागृहात शेतकरी मेळावा झाला. या वेळी कंपनीचे अध्यक्ष श्रीपाद लळित, नायब तहसीलदार दीपाली पंडित, कृषी अधिकारी विद्या पाटील, राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूहगटाचे अध्यक्ष दयानंद चौगुले, रेशीम शेतकरी वासुदेव घाग, अमर खामकर आदी उपस्थित होते.
या वेळी सावंत म्हणाले, रेशीम शेतीसाठी सामाजिक वनीकरण, मनरेगा आणि जिल्हा समग्र-२ योजना, सिंधुरत्न योजना आदी विविध योजनांमधून शेतकऱ्‍यांना अर्थसाहाय्य वा अनुदान उपलब्ध होते. त्याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्‍यांनी रेशीम शेती करावी. रेशीम शेतीला मार्केटची कोणतीही अडचण नसून, भविष्यामध्ये राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनीने कारखाना काढल्यास स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्याचा निश्‍चितच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पंडित यांनी शेतकरी हा देशाचा आत्मा असून, शेतकरी समृद्ध झाला तर देशही समृद्ध होणार आहे. शासकीय सेवेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्‍यांना सहकार्य करत त्यांचे प्रश्‍न सोडवण्याचे प्रयत्न करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com