
-चिपळुणात काँग्रेसचा जल्लोष, वाजवले ढोल
२० (पान ५ साठी)
- ratchl१३१.jpg ः
२३M०२५६९
चिपळूण ः काँग्रेस पक्षाला कर्नाटकात मिळालेल्या विजयानंतर जल्लोष करताना काँग्रेस तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी.
----
चिपळुणात काँग्रेसचा जल्लोष
कर्नाटकातील विजयाने आनंद ; कार्यकर्त्यांनी वाटले पेढे
चिपळूण, ता. १३ ः कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नेत्रदीपक यश मिळवले. या निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली असून, काँग्रेसच्या या विजयाचा जल्लोष देशभर साजरा करण्यात आला. चिपळुणात तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली चिंचनाका येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत विजयी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. यामध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. शनिवारी सकाळपासून मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या फेरीपासूनच काँग्रेस आघाडीवर राहिली आणि ती आघाडी शेवटपर्यंत राहिली. अखेर काँग्रेसने कर्नाटक राज्याच्या निवडणुकीत बहुमत सिद्ध केले. त्यामुळे देशभर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यामध्ये चिपळूणमध्येदेखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी काँग्रेसचा विजय असो, सोनियाजी गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है!, राहुलजी गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है!, आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह एकमेकांना पेढे भरवून विजयी आनंदोत्सव साजरा केला. या वेळी शहराध्यक्ष लियाकत शहा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, कबीर काद्री, राजेश कदम, गुलजार कुरवले, रूपेश आवले, राकेश दाते आदी उपस्थित होते.
--
लोकशाहीचा विजय
कर्नाटकात काँग्रेसने मिळवलेला विजय हा लोकशाहीचा विजय असून, पुढील निवडणुकांमध्ये देखील लोकशाहीचाच विजय होईल, अशी प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी दिली.