
सिंधी इक्तिशा ठरली ‘सिंधुसुंदरी २०२३’
02630
मळेवाड ः सौंदर्य स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन सन्मानित करताना मान्यवर, तर दुसऱ्या छायाचित्रात स्पर्धेतील सौंदर्यवती.
(छायाचित्र ः धनश्री मराठे)
सिंधी इक्तिशा ठरली ‘सिंधुसुंदरी २०२३’
मळेवाडमधील सौंदर्य स्पर्धा; सांस्कृतिक पर्यटन महोत्सवाची सांगता
सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. १३ ः येथे आयोजित सांस्कृतिक पर्यटन महोत्सवांतर्गत आयोजित ‘सिंधुसुंदरी २०२३’ या सौंदर्य स्पर्धेतील मानाचा मुकुट सिंधी इक्तिशाने पटकावला. मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायत व युवा मित्रमंडळाच्या वतीने मळेवाड जकात नाका येथील राणी पार्वतीदेवी विद्यालय मळेवाड केंद्र शाळा नंबर १ च्या भव्य पटांगणावर पाचदिवसीय ‘युवा सांस्कृतिक पर्यटन महोत्सव २०२३’चे आयोजन करण्यात आले.
महोत्सवाच्या सांगता समारंभादिनी ‘सिंधुसुंदरी २०२३’ ही सौंदर्य स्पर्धा झाली.
या स्पर्धेत एकूण १४ सौंदर्यवती सहभागी झाल्या. पहिली फेरी ही साडी फेरी होती. दुसरी वेस्टर्न, तर तिसरी परीक्षक फेरी होती. प्रत्येक फेरीमध्ये सहभागी स्पर्धकांनी एकापेक्षा एक अशी अदाकारी पेश करत रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. परीक्षकांच्या ‘गुगली’ प्रश्नांमध्ये काही स्पर्धक ‘क्लिन बोल्ड’ झाले, तर काही स्पर्धकांनी अचूक आणि विचारपूर्वक उत्तर देत परीक्षकांसह रसिकांची मने जिंकली. उत्तरोत्तर रंगतदार झालेल्या स्पर्धेत रसिक प्रेक्षकांनी काळोखात मोबाईल टॉर्च सुरू करून दिलेला प्रतिसाद हे खास आकर्षण ठरले. अखेर ‘सिंधुसुंदरी २०२३’चा किताब सिंधी इक्तिशा या सौंदर्यवतीने पटकावला. दुसरा क्रमांक पूजा कदम, तर तिसरा क्रमांक शर्वरी नाबरने पटकावला. बेस्ट स्माईलसाठी श्रद्धा साठविलकर, बेस्ट कॅटवॉक सानिका नागवेकर, बेस्ट हेअर स्टाईल महेक मर्चंट, उत्कृष्ट वेशभूषा सिंधी इफ्तिशा, तर बेस्ट पर्सनॅलिटीसाठी सानिका नागवेकर यांची निवड करण्यात आली. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम, मानाचा मुकुट व मानाचा बेल्ट देऊन सन्मान केला. या स्पर्धेचे परीक्षण पत्रकार प्रवीण मांजरेकर, कमलेश ठाकूर व मधुरा काणे यांनी केले. निवेदन हेमंत मराठे, शुभम धुरी यांनी केले. बक्षीस वितरणप्रसंगी सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, स्नेहल मुळीक, खुशी कुंभार, मधुकर जाधव, अर्जुन मुळीक, सानिका शेवडे, कविता शेवडे, गुरू मुळीक, भाजप मळेवाड शक्ती केंद्रप्रमुख लाडोबा केरकर, राहुल नाईक, ज्ञानेश्वर मुळीक, सचिन नाडर, सागर केरकर, हर्षद केरकर, काका सावळ, आपा काळोजी, शाण्या केरकर, अजित काळोजी, विजय चराटकर, अमित नाईक, तुषार नाईक, भाई गावडे आदी उपस्थित होते.