क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम पट्टा
क्राईम पट्टा

क्राईम पट्टा

sakal_logo
By

४ (पान ३ साठी)

जांभुळ फाटा येथे मारहाण

रत्नागिरी ः शहरानजीक मिरजोळे-जांभूळफाटा येथील चायनिज सेंटरवर मारहाण व सेंटरची तोडफोड केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वेश पाटील व साहिल पाटील (पूर्ण नाव-पत्ता माहित नाही.) अशी संशयित तरुणांची नावे आहेत. हा प्रकार गुरुवारी (ता. ११) रात्री जांभूळफाटा येथील चायनीज सेंटरच्या दुकानात घडला. रात्री फिर्यादी हे सेंटर बंद करत असताना दोघे संशयित आले. सेंटरमधील कूक हा पूर्वी संशयित सर्वेश पाटील यांच्याकडे कूक म्हणून कामाला होता. १५ दिवसांपूर्वी त्याने गावी जायचे आहे, असे सांगून काम सोडले होते. याचा राग मनात धरून सर्वेश पाटील व साहिल पाटील यांनी त्या कूकला लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरवात केली तर साहिल याने त्याच्या हातातील धारदार वस्तूने फिर्यादी यांच्या डोक्यात मारले. फिर्यादी यांच्यासोबत असलेले साक्षीदार वेदांत पावसकर याने भांडण सोडवण्याकरिता आला असता त्यालादेखील लाथाबुक्क्यांनी मारले. फिर्यादी यांना तुला बघून घेईन, मारून टाकीन, अशी धमकी देऊन चायनीज सेंटरमधील वस्तूंची तोडफोड केली. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सर्वेश पाटील व साहिल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
--
चिपळुणात तरुणाची आत्महत्या

चिपळूण ः शहरातील मुरादपूर परिसरातील अमेय पार्क येथील गुलाब इमारतीमधील तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दाबिन मिर्जाहुसेन पिरजादे (वय १८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (१२) रात्री नऊच्या सुमारास घडली. येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे; मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दाबिन पिरजादे याच्या घरी कोणीही नव्हते. अशातच त्याने आत्महत्या केली. दाबिन पिरजादे हा युवासेनेचा कार्यकर्ता होता. त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच युवासेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित होते.
--