-पूरनियंत्रणासाठी धरणे बांधणे आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-पूरनियंत्रणासाठी धरणे बांधणे आवश्यक
-पूरनियंत्रणासाठी धरणे बांधणे आवश्यक

-पूरनियंत्रणासाठी धरणे बांधणे आवश्यक

sakal_logo
By

८ (पान ३ साठी)


- ratchl१३७.jpg ः

चिपळूण ः जलपरिषेदत मनोगत व्यक्त करताना जलसिंचन तज्ञ दि. म. मोरे सोबत मान्यवर.
-------------

पूरनियंत्रणासाठी धरणे बांधणे आवश्यक

दि. म. मोरे ; वाशिष्ठी, शिवनदीची पाहणी

चिपळूण, ता. १३ ः चिपळूण शहरातील गाळ काढण्याचे काम हे चांगल्या पद्धतीने सुरू आहे. हे काम आता सातत्याने करावे लागणार आहे. शहराची पुरापासून मुक्तता करण्यासाठी धरणे बांधणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध जलसिंचन तज्ञ दि. म. मोरे यांनी व्यक्त केले. हेल्प फाउंडेशन चिपळूण या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी काही उपाययोजनांबाबत सूचना केल्या.
राज्याचे माजी सिंचन सचिव दि. म. मोरे यांनी चिपळूणमध्ये वाशिष्ठी व शिवनदीची पाहणी केली. त्यानंतर जलपरिषदेला प्रमुख वक्ते म्हणून बोलताना त्यांनी गाळ काढण्याच्या प्रक्रियेचे समर्थन केले. ते म्हणाले, हा विषय आता देखभालीअंतर्गत सातत्याने करावा लागेल. याशिवाय शहराला पुराच्या धोक्यापासून वाचवायचे असेल तर दरवाजे असलेली धरणे बांधावी लागतील. या धरणाचा निम्मा उपयोग हा पूर नियंत्रणासाठीच केला पाहिजे. जेव्हा पाऊस थांबेल त्या दरम्यानच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने हळूहळू पाण्याचा विसर्ग करायला हवा. चुकून खूप पाऊस पडतो व मध्येच थांबतो, पुन्हा तो परत पडतो व थांबतो. या पावसाच्या वागणुकीच्या अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानुसार पुढील उपाययोजनाही ठरवली पाहिजे. नदीतील अडथळे दूर करणे हा भाग महत्वाचा आहे. त्याचबरोबर एकूणच विचार करून नदीच्या अभ्यासासाठी समिती ही नेमणे अपेक्षित आहे.
येथील डीबीजे कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये जलपरिषद आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश कदम यांनी या जलपरिषदेच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. त्यांनी फाउंडेशनच्या कामाची माहिती दिली. या कार्यक्रमाला सिंचन सचिव दि. म. मोरे, प्रसिद्ध आर्किटेक्ट सारंग यादवाडकर तसेच प्रतिथयश वकील असीम सरोदे व माजी आमदार सदानंद चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अंजली कदम, सदस्य दीपक शिंदे, नोडल ऑफिसर खोत, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, शशिकांत मोदी, राजू भागवत, सफा गोटे, रसिका देवळेकर, रवीना गुजर, जीवन रेळेकर, फैयाज देसाई, धनश्री जोशी, गजेंद्र कदम, डॉ. विखारे आदी उपस्थित होते.