साळिस्तेत ‘हर हर महादेव’चा जयघोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साळिस्तेत ‘हर हर महादेव’चा जयघोष
साळिस्तेत ‘हर हर महादेव’चा जयघोष

साळिस्तेत ‘हर हर महादेव’चा जयघोष

sakal_logo
By

02652
साळिस्ते ः श्री देव खांबेश्वर, विठ्ठलादेवी मंदिराचा कलशारोहण सोहळा श्री मठ संस्थान दाभोली येथील श्रीमत दत्तानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते झाला. (छायाचित्र ः एन. पावसकर)


साळिस्तेत ‘हर हर महादेव’चा जयघोष

खांबेश्वर कलशारोहण उत्साहात; विविध कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १३ : साळिस्ते गावचे ग्रामदैवत श्री देव खांबेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा श्री मठ संस्थान, दाभोली येथील श्रीमद् दत्तानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते झाला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, भाविक आणि माहेरवाशिणी उपस्थित होत्या. यानिमित्त तीन दिवस सुरू असलेल्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला.
या जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त आयोजित तीन दिवस विविध कार्यक्रम उत्साहात आणि भाविकांच्या उपस्थितीत झाले. या सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. सकाळी ८.५० च्या मुहूर्तावर श्रीमद् दत्तानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा पार पडला. त्यानंतर मूर्ती प्रतिष्ठापना तत्वन्यास, पूर्वक प्राणप्रतिष्ठापना, देवतांची महापूजा, महाबलिदान आणि महापूर्णाहुती, प्रतिष्ठा उत्तरांग विधी, अभिषेक, विभुतीवंदन, देवालय उत्सर्ग, युप स्थापना, कर्म समाप्ती, महाआरती, गाऱ्हाणे, महाप्रसाद, दुपारनंतर देवीची ओटी भरणे व महिलांचे हळदीकुंकू असे कार्यक्रम झाले. रात्री जिल्हा परिषद शाळा साळिस्ते नं. १ च्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी या सर्व मुलांना व पहिल्या दिवशी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांतील सहभागी सर्व मुलांना गौरविण्यात आले. त्यानंतर डबलबारी भजनाचा जंगी सामना झाला. या सर्व कार्यक्रमांना साळिस्ते ग्रामस्थ, भाविक, माहेरवाशिणी व पाहुणे मंडळींची उपस्थिती लक्षणीय होती.
---
मान्यवरांनी घेतले श्रींचे दर्शन
दरम्यान, सोहळ्यावेळी खासदार विनायक राऊत, नगरसेवक बाळा नर, सतीश सावंत, सचिन सावंत, जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, वारगाव उपसरपंच नाना शेट्ये, राजा जाधव, नडगिवे सरपंच श्रीम. लाड, खारेपाटण माजी सरपंच विरेंद्र चिके, विजय केसरकर, संदेश पारकर, तळेरे व्यापारी संघटना अध्यक्ष स्वप्नील कल्याणकर, माजी सरपंच विनय पावसकर आदींनी श्रींचे दर्शन घेतले.