मसुरे येथे आजपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मसुरे येथे आजपासून विविध 
धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
मसुरे येथे आजपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

मसुरे येथे आजपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

sakal_logo
By

43020

मसुरे येथे आजपासून विविध
धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

दत्त मंदिराच्या वर्धापन दिनाचे निमित्त

मालवण, ता. १३ : मसुरे-गडघेरावाडी येथील श्री दत्त मंदिरचा १० वा वर्धापन दिन सोहळा १४ ते १६ मे या कालावधीत साजरा होत आहे. यानिमित्त उद्या (ता. १४) सकाळी ९ वाजता होम, ११ वाजता आरती, तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता आरती, तीर्थप्रसाद, रात्री १० वाजता मुलांचे रेकॉर्ड डान्स, सोमवारी (ता. १५) सकाळी ९ वाजता दत्ताभिषेक, ११ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी २ वाजता गडघेरा वारेसुत्रांची फेरी, रात्री ९ वाजता सद्गुरू आकाराम महाराज जामदार दीनानाथ वारकरी संप्रदाय यांचा सामुदायिक हरिपाठ (चंद्रकांत धावडे, जगन्नाथ धावडे), मंगळवारी (ता. १६) सकाळी ९ वाजता श्रींची महापूजा, सकाळी ११ वाजता आरती तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता डबलबारी भजन सामना श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळाचे बुवा अरुण घाडी (पावशी-कुडाळ) विरुद्ध श्री वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ बुवा संदीप लोके (लिंगडाळ-देवगड) यांच्यात होणार आहे. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.