कणकवली :सक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली :सक्षिप्त
कणकवली :सक्षिप्त

कणकवली :सक्षिप्त

sakal_logo
By

कणकवलीत उन्हामुळे काहिली
कणकवली ः तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये उन्हाचा पारा कमालीचा तापला आहे. गेले दोन दिवस नियमित तापमानामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. अवकाळी पावसामुळे वातावरणात कमालीचा बदल होत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण त्यामुळे उखाणा वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण होऊ लागले आहेत.

02763
रेल्वे स्थानक परिसरातील रस्ता खड्डेमय
कणकवली ः शहरातील रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नरडवे रस्त्यापासून रेल्वे स्थानकाकडे जाणारा दोनशे मीटरच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी रेल्वेला आहे. त्यामुळे प्रवासी संख्येबरोबरच या परिसरात येणाऱ्या वाहनांची संख्या ही वाढली आहे, रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. रेल्वे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.