राजापूर ः

राजापूर ः

rat१३९.txt

बातमी क्र. .९ (टुडे पान १ साठी बिग स्टोरी)

फोटो ओळी
- rat१४p१.jpg-KOP२३M०२७८६ राजापूर ः प्रवाहित मूळगंगा
- rat१४p२.jpg- KOP२३M०२८०३ बंद झालेले गायमुख
- rat१४p३.jpg-KOP२३M०२८०४ चौदा कुंड असलेला गंगा परिसर.
- rat१४p४.jpg- KOP२३M०२८०५ सुशोभिकरणाच्या प्रतिक्षेत असलेले श्री दत्तमंदिर
- rat१४p५.jpg- KOP२३M०२८०६ डागडुजी आणि नूतनीकरणाच्या प्रतिक्षेत असलेले भक्तनिवास
- rat१४p६.jpg- KOP२३M०२८०७ ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिर.
- rat१४p७.jpg-KOP२३M०२८०८ गरम पाण्याचा झरा
- rat१४p८.jpg-KOP२३M०२८०९ श्रीकांत घुगरे
- rat१४p९.jpg- KOP२३M०२८१०मंगेश तिर्लोटकर
- rat१४p१०.jpg-KOP२३M०२७८७ संतोष गोंडाळ
- rat१४p११.jpgKOP२३M०२७८८ - प्रकाश पुजारे
- rat१४p१२.jpg- KOP२३M०२७८९ राजू कार्शिंगकर
--------

गंगा प्रगटूनही विकासगंगा आटलेलीच

पर्यटनदृष्ट्या विकासाची संधी ; नियोजन,कल्पकतेचा अभाव


इंट्रो

अवघ्या महाराष्ट्रासह परराज्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या राजापूर तालुक्यातील उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगा आगमनाच्या काळामध्ये भक्तगणांच्या स्नानासाठी जणूकाही कुंभमेळाच भरतो. गंगामाईच्या वास्तव्याच्या काळात वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते; मात्र आधी कोरोना महामारी त्यानंतर पावसाळा आदींमुळे आर्थिक उलाढालीला ब्रेक लागला आहे. धार्मिक पर्यटनासाठी जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या स्थानापैकी एक असूनही येथील अर्थगंगेचा प्रवाह काही विस्तारत नाही. भाविकांना पवित्र गंगास्नानाची पर्वणी साधता येत असल्याने पर्यटकांचा ओघ असला तरी त्यांच्यासाठी पुरेशा सुविधा येथे नाहीत.या परिसरातील धूतपापेश्वरसह तालुक्यातील पर्यटनस्थळांशी याची सांगड घातलेली नाही.गंगाकेद्रित पर्यटनात कोणकोणती पॅकेजिस देता येतील याचा विचार धोरणे आखताना झाला नाही.पर्यटन विकासाच्या पुढाऱ्यांच्या घोषणा, आलेल्या निधितून जुजबी कामे यापलिक़डे मजल गेलेली नाही.नियोजनाची वानवा अन कल्पकतेचा अभाव यामुळे दारी गंगा येऊनही हा परिसर विकासात कोरडाच आहे.

- राजेंद्र बाईत,राजापूर


गंगास्थानाची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी- राजापूरच्या गंगेच्या इतिहासाची पार्श्‍वभूमीही मोठी रंजक आहे. स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, राजे प्रतापरूद्र, अहिल्याबाई होळकर, सवाई माधवराव, नाना फडणवीस, बापू गोखले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, वि. दा. सावरकर आदींनी या गंगातीर्थक्षेत्राला भेटी दिल्या आहे. भारतावर दीडशे वर्ष राज्य करणार्‍या इंग्रजांच्या व्हाईसरॉय लॉर्ड वेलस्ली, माऊंटबॅटन आदींनाही गंगामाईची भूरळ पडली. त्यांनीही गंगातीर्थक्षेत्राला भेट दिली आहे. अनेक लेखक, कवींनीही या ठिकाणी भेटी दिल्याची माहिती उपलब्ध होते. वयाच्या ६०व्या वर्षी गंगातीर्थक्षेत्री भेट देऊन गंगास्नान करणार्‍या कवीवर्य मोरोपंत यांनी गंगेची थोरवी सांगणारे ‘गंगा प्रतिनिधीर्थ कीर्तन’ हे काव्य रचले. ब्रिटिशांच्या काळामध्ये निर्यातकेंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले राजापूरचे बंदर स्वराज्यामध्ये सामील केल्यानंतर राजे प्रसिद्ध तीर्थक्षेत्री गंगास्नानासाठी गेल्याचे सांगितले जाते.


वैशिष्ट्यपूर्ण चौदा कुंडे

गंगातीर्थक्षेत्री मूळ गंगा, चंद्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुनाकुंड, सरस्वतीकुंड, गोदावरी कुंड, कृष्णकुंड, नर्मदाकुंड, कावेरीकुंड, अग्नीकुंड, भीमाकुंड, चंद्रभागा कुंड आणि काशीकुंड अशी १४ कुंडे आहेत. चौदाव्या शतकामध्ये राजा प्रतापरूद्र याने या चौदाही कुंडाचे आणि येथील इमारतींचे बांधकाम केल्याची माहिती ग्रंथांमधील नोंदीद्वारे अवगत होते. व्हाइसरॉय लॉर्ड वेलस्ली आणि सावंतवाडीचे संस्थानिक राजे भोसले यांनी या बांधकामाची त्यानंतर डागडुजी केल्याचाही काही ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो. काही अंतरावरील १४ कुंडांमधील वेगवेगळे तापमान असलेल्या पाण्याने गंगामाई भक्तगणांना स्नान घातले. भिन्न वैशिष्ट्यांच्या उगमनानुसार कुंडाच्या क्षेत्राचे बांधकाम करण्याचे आव्हान होते. मात्र, याही स्थितीमध्ये त्या काळात कुंडाच्या आवाराचे करण्यात आलेले बांधकाम आजच्या काळातील स्थापत्यशास्त्राला आव्हान ठरले आहे.

गंगेचे झालेले आगमन आणि तिच्या वास्तव्याचा काळ

मार्च १९८५ (६८ दिवस), जून १८८५ (१७), डिसें. १८८६ (४५), ऑक्टो., १९८९ (१८), डिसें. १८९० (४५ ), ऑगस्ट १८९३ (१६ ), जुलै १८९५ (१८), जून १८९७ (२२), एप्रिल १८९९ (४५), मार्च १९०१ (४५), एप्रिल १९०२ (५२), एप्रिल १९०५ (६६), सप्टेंबर १९०८ (५१), मार्च १९१० (५१), मे १९१३ (३६), जून १९१५ (२९), सप्टें. १९१८ (५३) त्यानंतर १८ वर्षाचा खंड, जुलै १९३६ (१२), जून १९३८ (२७), एप्रिल १९४२ (४५), ऑक्टों. १९४५ (३३), मार्च १९४८ (३९), मार्च १९५० (५३), जाने. १९५२ (२७), जुलै १९५५ (४८), ५ मे १९५७ (४१), ८ मार्च १९६० (६१), २३ जाने. १९६३ (४८), ७ मार्च १९६५ (५०), ८ मार्च १९६७ (७१), २ मार्च १९७० (७२), २ जाने. १९७३ (५९) २८ डिसें. १९७४ (६४), २२ फेब्रु. १९७७ (८३), ३० डिसें. १९७९ (६८), ४ जून १९८१ (१८), ५ जून १९८३ (२१), ४ मे १९८५ (४५), १७ मार्च १९८७ (६९), ३ एप्रिल १९९० (५९), ३० मार्च १९९३ (७५), १० जून १९९५ (६१), २५ एप्रिल १९९८ (६२), २६ जाने. २००१ (९८), ९ एप्रिल २००३ (२९), २० डिसें. २००४ (६३), १३ मे २००७ (७०), २८ मे २००९ (७०), १० फेब्रु. २०११ (११६), ११ एप्रिल २०१२, २३ जून २०१३, २३ जुलै २०१४, २७ जुलै २०१५, ३१ ऑगस्ट २०१६, ७ मे २०१७, ६ डिसेंबर २०१७, ७ जुलै २०१८, २५ एप्रिल २०१९ (६०), १५ एप्रिल २०२० (६७), ३० एप्रिल २०२१, मे २०२२. (आजतागायत)

निर्गमनाचेही गूढ.....

विविध पौराणिक ग्रंथामधून गंगामाईचा श्रीदेव शंकराच्या पिंडीतून उगम झाल्याच्या नोंदी आढळतात. मात्र, उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगामाई थेट पाताळातून प्रकट होते. गंगामाईचे नेमके कधी आगमन होणार आणि निर्गमन कधी होणार आहे, हे अनिश्‍चित आहे. त्याचे अद्यापही कोडे कुणालाही सुटलेले नाही. सर्वसाधारणपणे तीन वर्षानंतर आणि आगमनानंतर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर गंगामाईचे निर्गमन होत असल्याचे सांगितले जाते. त्यातच, उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई असते अशा काळामध्ये गंगामाईचे आगमन होत असल्याचे बोलले जाते. त्याप्रमाणे आगमनही यापूर्वी झाले आहे. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये गंगामाईचे आगमन आणि निर्गमन यासह वास्तव्याच्या कालावधीमध्ये सातत्याने अनियमितता असल्याचे चित्र दिसते.

काय पाहाल गंगातीर्थक्षेत्री

श्री दत्तमंदिर
श्री रामेश्‍वर मंदिर
हेमाडपंथी पुरातन भिंतीच्या कमानी
पुरातन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना दीपमाळ
काही फुटाच्या अंतरावर असलेली १४ कुंडे
१४ कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे
सततधारा वाहणारी मूळगंगा - गायमुख
अहिल्याबाई होळकरनी अन्नदान केलेली इमारत
बारमाही वाहणारा गरम पाण्याचा झरा
ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचे आकर्षक मंदिर


गरम पाण्याचे कुंड

गंगातीर्थक्षेत्रापासून काही कि.मी. अंतरावर गरम पाण्याचे कुंड आहे. अर्जुना नदीच्या काही फुटाच्या अंतरावर हे गरम पाण्याचे कुंड आहे. गरम पाण्याचा हा झरा बारमाही वाहतो. काही फुटाच्या अंतरावरील नदीच्या पाण्याचे तापमान थंड असताना या झर्‍याच्या पाण्याच्या तापमानाबाबत गूढ आहे. त्या ठिकाणी पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्नान करण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी स्नान केल्याने त्वचेचा विकार कमी होतो असे सांगितले जाते.

कसे जाल गंगातीर्थक्षेत्री

शहरापासून पाच कि. मी. अंतरावर असलेल्या गंगातीर्थक्षेत्री जाण्यासाठी चांगला रस्ता असून खासगी गाड्या, रिक्षातून त्या ठिकाणी जा-ये करता येते. पर्यटकांच्या गाड्यांच्या पार्किंसाठी स्वतंत्र व्यवस्था वा जागा नसली तरी त्या ठिकाणी गाड्या पार्किंगसाठी गंगा परिसरामध्ये मोकळी जागा आहे. त्यातच, गंगा वास्तव्याच्या काळामध्ये एसटी आगारातून स्वतंत्र गाड्या सोडण्यात येतात. मात्र, सद्यःस्थितीमध्ये एसटी आगाराकडून भाविकांना ये-जा करण्यासाठी गाड्या सुरू ठेवलेल्या नाहीत.

अशी ठप्प झाली आर्थिक उलाढाल

उन्हाळे येथील तीर्थक्षेत्री गंगामाईचे होणारे आगमन आणि वास्तव्याचा काळ भाविकांच्यादृष्टीने एक धार्मिक पर्वणी असते. त्यामुळे गंगामाईच्या वास्तव्याच्या काळात विविध राज्यातील भाविक या ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी येतात. या काळातील भाविकांची उपस्थिती आणि रेलचेलीमुळे या ठिकाणी एका हंगामामध्ये सुमारे दीड कोटीहून अधिक रुपयांची विविध माध्यमातून आर्थिक उलाढाल होते. त्यातून, शेकडो लोकांना विविध स्वरूपाचा रोजगार मिळतो. मात्र, गंगामाईचे आगमन आणि वास्तव्याच्या काळामध्ये कोरोना महामारीतील लॉकडाउन गेली दोन वर्ष कायम राहिले आहेत. त्यामुळे या कालावधीमध्ये गंगा तीर्थक्षेत्री जाण्यास भाविकांना मनाई करण्यात आली होती. त्यातून, गंगातीर्थक्षेत्री शुकशुकाट पसरला. या सार्‍याच्या परिणामी गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी होणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीसह शेकडोंना मिळणार्‍या रोजगाराला ब्रेक लागला आहे. गतवर्षी मे महिन्यामध्ये गंगामाईचे आगमन झाल्यानंतर पावसाळा असल्याने पर्य़टकांचा ओघ आणि आर्थिक उलाढाल कमीच होती. त्यामुळे कोरोना महामारीमध्ये आर्थिक उलाढालीला लागलेला ब्रेक गेल्या वर्षभरापासून कायम राहिलेला आहे. या सार्‍या प्रतिकूल स्थितीमध्ये विविध व्यवसायातून होणारी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढालही आजही ठप्प झालेली आहे. याचा अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे.
राज्यासह परराज्यातील लाखो संख्येने भाविक गंगामाईच्या वास्तव्याच्या काळात पवित्र गंगास्नानाची र्पवणी साधण्यासाठी येतात; मात्र, या भाविकांना अपेक्षित असलेल्या विविध सोयीसुविधांची या ठिकाणी काहीशी वानवा राहिलेली आहे. या ठिकाणच्या विविध तापमान असलेल्या कुंड्यांच्या परिसरातील फरशा ठिकठिकाणी उचकटलेल्या आहेत. त्यामुळे कुंडांचा परिसर सुशोभिकरणासह व्यवस्थित बांधकाम होणे गरजेचे आहे. या ठिकाणी स्नानासाठी येणार्‍या महिला आणि पुरुष भक्तगणांसाठी ड्रेसिंगरूमसह प्रसाधनगृहांची या ठिकाणी वानवा आहे. विविध सोयीसुविधांनीयुक्त अशा सुसज्ज भक्तनिवासाची सुविधा नाही. त्यामुळे या ठिकाणी स्नानासाठी येणार्‍या भक्तगणांची मोठी गैरसोय होते. त्याचवेळी मूळ गंगेच्या ठिकाणचे श्री दत्तमंदिरही सुशोभिकरणाच्या प्रतिक्षेत आहे. या सुविधांच्या उभारणीच्या माध्यमातून गंगातीर्थक्षेत्री विकास गंगेची प्रतीक्षा राहिलेली आहे.

चौकट ः

गंगामाई वास्तव्याच्या काळात भेट देणार्‍या भाविकांची संख्या ः ३० लाख
कुठून येतात भाविक ः महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, राजस्थान


गंगामाईच्या वास्तव्यातील आर्थिक उलाढाल

दुकानांची संख्या ः १५०
हॉटेल व्यवसाय उलाढाल ः २० लाख रु.
नारळ, ओटी, पूजासाहित्य, प्रसाद ः २० लाख रु.
शितपेय, पाणी बाटली विक्री ः १ लाख रु.
हळदकुंकू विक्री, गुलाल ः ३० लाख रु.
उस्मानाबादी पेढे ः ५ लाख रु.
वाहतूक व्यवस्था (खासगी आणि एसटी) ः ३० लाख रु.
बेलपाने, फुलेविक्री ः ५ लाख रु.
गंगा देवस्थान ः ४ लाख ५० हजार रु.
खेळणी, बांगडी व्यवसाय ः ५ लाख रु.

कोट
गंगास्नानाने शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण होत असल्याने गंगामाईच्या वास्तवाच्या काळात अनेक भाविक या ठिकाणी गंगास्नानासाठी येतात. आजही गंगा कमी प्रमाणात प्रवाहित असली तरी भाविकांना गंगास्नानाची पर्वणी साधणे शक्य आहे. गंगास्नानासाठी येणार्‍या भाविकांची सद्यःस्थितीतील मर्यादित संख्या पाहता व्यावसायिकांनी विविध स्वरूपाची दुकाने थाटलेली नाहीत. साहजिकच, त्यामुळे गंगा देवस्थानासह या दुकानांच्या माध्यमातून अनेकांच्या घरी येणारी आर्थिक गंगा काहीशी थांबली आहे. निसर्गापुढे सारेच हतबल आहेत.
- श्रीकांत घुगरे, अध्यक्ष, गंगा देवस्थान

कोट
गंगामाईच्या वास्तव्याच्या काळात गंगा परिसरामध्ये विविध प्रकारची दुकाने थाटत होतो. मात्र, आधी कोरोना महामारी आणि त्यानंतर पावसाळा यामुळे दुकाने नेहमीप्रमाणे थाटता आलेली नाहीत. त्यातून, काहीसा मिळणारा रोजगार बुडाला आहे.
- मंगेश तिर्लोटकर, उन्हाळे ग्रामस्थ
----------
कोट
- गंगास्नानासाठी उन्हाळे तीर्थक्षेत्री जा-ये करण्यासाठी भाविकांकडून खासगी रिक्षांचा आधार घेतला जात होता. त्यातून, रिक्षा व्यावसायिकांना मिळणार्‍या प्रवासी भाडेतून चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र, आधी कोरोनाचे निर्बंध आणि त्यानंतर सुरू झालेला पावसाळा यामुळे गंगास्नानासाठी येणार्‍या भाविकांची संख्या कमी झाली आहे. दुसर्‍या बाजूला पूर्वीच्या तुलनेमध्ये खासगी गाड्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे उन्हाळे तीर्थक्षेत्री येणार्‍या भाविकांकडून खासगी गाड्यांचा अधिक उपयोग केला जातो. या सार्‍यातून रिक्षा व्यावसायिकांना उन्हाळे तीर्थक्षेत्री ये-जा करण्याच्या प्रवासी भाड्यातून मिळणारे घटले आहे.
- संतोष गोंडाळ, रिक्षा व्यावसायिक

कोट
गंगा स्नानाची पर्वणी साधण्यासाठी राज्यासह परराज्यातील मोठ्यासंख्येने भाविक उन्हाळे तीर्थक्षेत्री येतात. मात्र, त्याठिकाणी आवश्यक असलेल्या महत्वाच्या सोयीसुविधांची उपलब्धी नसल्याने भाविकांना महत्वाच्या सुविधांची वानवा भासते. त्यामुळे चेजिंग रूम, भक्तनिवास यांसह अन्य महत्वाच्या सोयीसुविधांची उभारणी होताना या परिसराच्या सुशोभीकरण्याच्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
--राजू कार्शिंगकर
--------
कोट
गंगामाईच्या वास्तव्याच्या काळामध्ये छोटे-छोटे विविध स्वरूपाचे व्यवसाय सुरू केले जात होते. त्यातून, चांगले उत्पन्नही मिळत होते. मात्र, आधी कोरोना आणि त्यानंतर पावसाळा यांमुळे तीर्थक्षेत्राच्या परिसरामध्ये कोणतेही हॉटेल, अन्य स्वरूपाचे दुकान सुरू करता आलेले नाही. त्यामुळे मिळणारे उत्पन्न बुडाले आहे. त्याचवेळी या ठिकाणी येणार्‍या भाविकांसाठी विविध स्वरूपाच्या अत्यावश्यक सोयीसुविधांचीही उभारणी होणे गरजेचे आहे.
--प्रकाश पुजारे, व्यवसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com