संक्षिप्त

संक्षिप्त

हरचेरीत नव्या धरणाचा प्रस्ताव
रत्नागिरी ः वाढत्या उष्म्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात घट होत आहे, तर दुसरीकडे उद्योगांसाठी पाण्याची मागणी वाढत असल्याने एमआयडीसीने काजळी नदीवर हरचेरी येथे सुमारे १४ कोटी खर्च करुन ०.०५२० टीएमसी क्षमतेचे नवे धरण उभारण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाकडे पाठविला आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या पाणी साठ्यात मोठी वाढ होणार आहे. सध्या विविध धरणांच्या माध्यमातून होणारा पाणी साठा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरतो. त्यामध्ये आता वाढ होऊन जून अखेरपर्यंत एमआयडीसी रत्नागिरीतील उद्योगांसह नजिकच्या गावांना मुबलक पाणी पुरवठा करु शकणार आहे. धरण उभारताना कोणतेही क्षेत्र बाधित होणार नसल्याचे एमआयडीसीने स्पष्ट केले आहे

रोपांच्या विक्रीतून २.४३ लाखांचे उत्पन्न
खेड ः तालुका कृषी कार्यालयांतर्गत येणाऱ्या कृषी चिकित्सालय तथा तालुका फळरोप वाटिकेच्या भरणे विभागाला गतवर्षात कलम रोपांसह गांडूळ खताच्या विक्रीतून ३ लाख ५३ हजाराहून अधिक उत्पन्न प्राप्त झाले आहे. वाटिकेमध्ये विविध फळांच्या कलम रोपांसह शोभिवंत रोपांची २४ हजाराहून अधिक रोपे विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती, फळरोप वाटिकेचे कृषी पर्यवेक्षक रवी चाळके यांनी दिली. भरणेतील फळरोप वाटिकेतून शेतकरी, बागायतदार तसेच नागरिकांनी गतवर्षी विविध जातीच्या कलम रोपांची व शोभिवंत रोपांची खरेदी केली. विकल्या गेलेल्या २४ हजार ८७६ रोपांतून २ लाख ४३ हजाराचे उत्पन्न मिळाले.

दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन
रोजगार मेळावा २६ मे रोजी
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन २६ मे २०२३ रोजी करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व खाजगी आस्थापनांनी, त्यांचेकडील रिक्त पदे भरणेबाबत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र याविभागाचे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर रिक्ते पदे नोंदवावी. जिल्हयातील सर्व खाजगी आस्थापनांनी त्यांचेकडील User Id व पासवर्डचा वापर करुन Login करुन त्यांचेकडील रिक्त पदे नोंदवावी तसेच नोंदणी नसल्यास नवीन नोंदणी करीता व अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास सहायक आयुक्तांनी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com