सदर ः मुलांच्या तणावमुक्त अध्ययनासाठी सहसंवाद गरजेचा

सदर ः मुलांच्या तणावमुक्त अध्ययनासाठी सहसंवाद गरजेचा

रत्नागिरी टुडे पान ३ ८ मे रोजीच्या अंकातून लोगो व लेखक फोटो घेणे...
लोकल टू ग्लोबल--------लोगो

- rat१४p१३.jpg ः - डॉ. गजानन पाटील

मुलांच्या तणावमुक्त अध्ययनासाठी सहसंवाद गरजेचा

प्राथमिक स्तरावर शिकणारी मुलं किती आनंदी, उत्साही, धावणारी, पळणारी, खेळणारी, उड्या मारणारी, दंगा करणारी असतात. या निसर्गाने लहान मुलांमध्ये एक अनोखी शक्ती दिलेली असते; पण शाळांमध्ये अशी कांही मुलं घाबरलेली, अबोल, तणावग्रस्त असतात. अशा मुलांकडे कधी कधी दुर्लक्ष होतं. नंतर नंतर शिक्षणव्यवस्था त्या मुलांना स्वमग्न गटात बसवते. तशी नोंद करून वरिष्ठ कार्यालयाला कळवते. मग वरिष्ठ कार्यालयाकडून एखादा तज्ञ येतो नि मुलाशी वरवरचा संवाद साधत डायरी भरतात. ज्या मुलांना कशाचातरी तणाव आहे जो शोधून त्यावर उपाययोजना करायला हवी या बाबीकडे दुर्लक्ष होतं. असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. बालवाडी अगर प्राथमिक स्तरावर मुलाच्या अशा वर्तनाचा शोध लावून त्याला समजून घेतले नि समजून दिले तर अशी मुलं पुढे चांगली बनतात; पण काही मंडळी अर्थात् पालकही म्हणतात की, मुलाला फारसा कशाचा ताण नसतो. वास्तविक पाहता हे विधान चुकीचे आहे.

- डॉ. गजानन पाटील
----------------

लहान मुलांवर तणाव असतो. त्या तणावाचं परिणाम त्याच्या शिकण्यावर, वागण्यावर होतो. असं एक संशोधन सिंधुदुर्ग डाएटला असताना केले होते. त्याचं कारणही तसंच झालं होतं. एकदा शहरालगत असलेल्या एका शाळेला भेट देण्यासाठी गेलो होतो. शाळा छोटी होती. तिसरीच्या वर्गातील मुलांशी त्यांच्यासोबत खाली बसून संवाद साधत असताना एक मुलगा खाली मान घालून बसला होता. तो कशातही सहभाग घेत नव्हता. शिक्षिकेला त्याच्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, तसाच आहे तो. काहीच बोलत नाही. मग त्याचं दप्तर पाहिलं. त्याने लिहिलेल्या वह्या तपासल्या. त्याने वहीच्या मागील पानावर जोरजोराने गिरगिटलं होतं. त्याला हे काय विचारल्यावर तो बोलला नाही. त्याला जवळ घेतला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तसा तो म्हणाला, मला राग येतो. पुढे काहीच बोलला नाही. त्याच्या बाईंना सांगितलं, उद्या सकाळी ११ वा. याच्या पालकांना डायरेक्ट ऑफिसला पाठवा. दुसऱ्या दिवशी दोघे पालक न येता त्या मुलाची आई आलेली. ती खूप घाबरलेली. त्यांना धीर दिला. त्यांनी जे सांगितले त्यामुळेच त्या मुलाच्या वह्याच्या पानांवर गिरगिटल्याचा सहसंबंध सापडला. त्याच्या वडिलांनी आईला माराहाण करून घरस्फोट घेतला होता. या सर्वांचा परिणाम मुलांच्या मानसिक ताणावर झाल्याने तो वहीत असं लिहायचा. सामान्यपणे मुलांना तणाव येतो. त्याची कारणं अनेक आहेत. जसे काही कौटुंबिक संघर्ष आणि बिघडलेले नातेसंबंध. ज्या घरात पालक किंवा इतर कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत वादविवाद आणि भांडण होते अशा घरात वाढणारी मुले तणावग्रस्त असतात. याचबरोबर मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे काही शैक्षणिक कारणं असतात जसे की, मुलांना शैक्षणिक अपेक्षा आणि स्पर्धेचा ताण निर्माण करतात. ज्यामुळे चिंता व भिती निर्माण होऊन प्रेरणा कमी होते. त्यातून अपयशाची भीती उद्भवू शकते. कौटुंबिक संघर्ष, घटस्फोट किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचे नुकसान यामुळे मुलांवर ताण येऊ शकतो. त्याच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तसेच त्यांच्या समाजात किंवा घरात गुंडगिरी, अत्याचार किंवा हिंसाचारसारख्या आघात किंवा हिंसाचाराच्या संपर्कात असलेल्या मुलांना ताण येऊ शकतो. याशिवाय गरीब कुटुंबात वाढलेल्या मुलांना अन्नाची असुरक्षितता, अस्थिर राहणीमान आणि मूलभूत गरजा नसणे यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यावर ताण येऊ शकतो. या व्यतिरिक्त ज्या मुलांना स्वतःशी संघर्ष करावा लागतो, सामाजिक नकाराचा अनुभव येतो किंवा भेदभाव अनुभवतो त्यांना चिंता आणि नैराश्यासारख्या तणाव आणि भावनांचा सामना करावा लागतो. म्हणून शालेय स्तरावर मुलांच्या मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी तणाव घटकांना रोखणे आणि त्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षक व पालकांनी मुलांशी चांगला सहसंवाद करणे गरजेचे आहे.

(लेखक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)
----------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com