
वार्षिक कला, क्रीडा स्पर्धांना देवगडात उत्स्फूर्त प्रतिसाद
swt141.jpg
02815
देवगड : विजेत्यांचा स्वाती देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
वार्षिक कला, क्रीडा स्पर्धांना
देवगडात उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १४ : खेळामुळे शारीरिक विकास होऊन मानसिकता प्रबळ बनते. दररोज किमान अर्धा खेळले पाहिजे. खेळामुळे चपळता वाढते. खेळातून व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते, असे मत येथील परिविक्षाधीन तहसीलदार स्वाती देसाई यांनी येथे व्यक्त केले.
येथील तारामुंबरीमधील तारा स्पोर्टस क्लबच्यावतीने आयोजित वार्षिक कला, क्रीडा पारितोषिक समारंभाच्यावेळी त्या बोलत होत्या. मुंबई येथील मनीषा धुरत यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा प्रारंभ झाला. धावणे, उलट चालणे, स्लो सायकल, पोहणे स्पर्धा, गोठाता उडी, फुगा फोडणे आदी स्पर्धा झाल्या. विजयी व उपविजेत्या खेळाडूंचा गौरव स्वाती देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, प्रमोद कांदळगावकर, सूर्यकांत जोशी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले. तारामुंबरी तारा स्पोर्टस क्लब अध्यक्ष सतीश धुरत यांनी गेल्या ३५ वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला.
यावेळी स्थानिक महिलांनी ‘मिशन सात पंचेचाळीस’ ही एकांकिका सादर करून मोबाईलचा अतिरेक यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी चंद्रशेखर खवळे यांच्या हस्ते स्पर्धा विजेत्या मुलांना आणि महिलांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. रात्री मुलांचे रेकॉर्ड डान्स आणि विजय हरम लिखित व दिग्दर्शित सामाजिक एकांकिका सादर करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष देविदास परब, सचिव जागृत जोशी, कोषाध्यक्ष नितीन चोपडेकर उपस्थित होते.